For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खराब हवामानामुळे पुणे - चिपी फ्लाय ९१ विमान आज अचानक झाले रद्द

11:18 AM Oct 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
खराब हवामानामुळे पुणे   चिपी फ्लाय ९१ विमान आज अचानक झाले रद्द
Advertisement

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पर्यटकांना फटका

Advertisement

परूळे । प्रतिनिधी

खराब हवामानामुळे पुणे - चिपी सिंधुदुर्ग विमान सेवा आज शनिवारी रद्द करण्यात आली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोकणात पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे. आणि या पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना विमान सेवा रद्द झाल्याने फटका बसला आहे. आज पासून मुंबई - चिपी सिंधुदुर्ग ही अलायन्सची विमानसेवा बंद होत आहे . यामुळे मुंबई - सिंधुदुर्ग हवाई प्रवास काही काळासाठी थांबणार आहे . अशा परिस्थितीतच नियमित सेवा देणारे फ्लाय ९१ ची पुणे चिपी सिंधुदुर्ग सेवा खराब हवामानामुळे आज रद्द करण्याची वेळ आली. पुणेहून चिपी ,सिंधुदुर्ग मध्ये 50 प्रवाशांना घेऊन विमान निघाले. मात्र शनिवारी सकाळी 8:45 च्या सुमारास विमानतळ परिसरात दोन घिरट्या घातल्यानंतर हवामान खराब असल्याचा अंदाज आल्याने हे विमान गोव्याच्या दिशेने नेण्यात आले . या दरम्यान चिपी ते पुणे प्रवास करण्यासाठी २० प्रवासी चिपी विमानतळावर दाखल झाले होते . अचानक विमान रद्द झाल्याने प्रवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. विमानतळाच्या परिसरात धुक्याची चादर निर्माण झाल्याने आज विमान माघारी गेल्याची चर्चा सुरूहोती. पुणे - चिपी विमान रद्द झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले . पुणेहून आठवड्यातील शनिवार ,रविवारी फ्लाय ९१ चे विमान येते. मात्र आज अचानक रद्द झाल्याने प्रवाशांना फटका बसला. सिंधुदुर्गात येणारे विमान आज शनिवारी पुन्हा एकदा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.