कोल्हापूर- नागपूर -सुरत विमानसेवा एप्रिलमध्ये !
कोल्हापूर
कोल्हापूर-नागपूर- सुरत अशी विमानसेवा एप्रिल महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. या शक्यतेला स्टार एअरच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
कोल्हापुर विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरु झाल्यापासून येथून उड्डाणांची संख्याही वाढली आहे. कोल्हापूर -मुंबई विमानसेवेला मोठा प्रतिसाद आहे. यामुळे या मार्गावर आणखी एक विमान सुरू करण्याची मागणी विमान प्रवाशातून होत आहे.
दरम्यान,एप्रिल महिन्यापासून कोल्हापूर-नागपूर-सुरत या मार्गावर स्टार एअरची विमानसेवा सुरु होण्याची शक्यता आहे.त्यासाठी हालचाली सुरु आहेत.स्टार फ्लाईट रोज दुपारी ३.३४ वाजता कोल्हापुरहून नागपूरात पोहोचेल. तिथून दुपारी ४.१५ वाजता कोल्हापूरकडे रवाना होईल. तसेच कोल्हापूर सुरत मार्गावर विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे स्टार एअरच्या अधिकाऱ्यांनी तरूण भारत - संवादशी बोलताना सांगितले.