कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापूर - नागपूर विमानसेवा आजपासून

11:53 AM May 15, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

कोल्हापूर ते नागपूर विमानसेवेला सुरूवात होत आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूर थेट राज्याच्या उपराजधानीशी हवाई मार्गे जोडले जात आहे.आठवडयातील पाच दिवस कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर विमानसेवा सुरू होत असून, स्टार एअरवेजच्या विमानात 12 बिझनेस क्लास आणि 64 इकोनॉमी क्लास आसन व्यवस्था असेल. त्यामुळे कोल्हापूरच्या उद्योग, व्यापार, पर्यटनाला चालना मिळणार आहे.

Advertisement

खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने कोल्हापूर विमानतळाचा विकास आणि विस्तार यासाठी प्रयत्न केले, केंद्र सरकार स्तरावर पाठपुरावा केला. त्यामुळे धावपट्टी विस्तारीकरण, नाईट लॅण्डिंग, आधुनिक अग्निशमन वाहन, नवी टर्मिनल बिल्डिंग अशी कामे मार्गी लागली आहेत.

विमानतळावरील भौतिक सुविधांसह विविध मार्गावर हवाई सेवा सुरू व्हावी, यासाठी खासदार महाडिक प्रयत्नशिल आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता कोल्हापूर ते नागपूर विमानसेवा सुरू होत आहे. आजपासून (दि 15 मे) मंगळवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार आणि शनिवार असे आठवडयातील पाच दिवस, स्टार एअरवेजकडून कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर विमानसेवा सुरू होत आहे.

नागपूरातून सकाळी 10 वाजता उडाण- सकाळी 11.30 वाजता कोल्हापुर लॅडिंग

कोल्हापुरातून दुपारी 12.00 वाजता उडाण-नागपूरमध्ये दुपारी 1.30 वाजता लॅडिंग

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article