Mahapalika Election 2025: मनपा निवडणुकीत ओबीसींची संख्या कायम, 22 उमेदवारांना संधी मिळणार?
त्यामुळे महापालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षण कायम राहणार आहे
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरु असून सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण कायम ठेण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामुळे महापालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षण कायम राहणार आहे, त्यानुसार शहरात २१ अथवा २२ जागा ओबीसींसाठी राखीव राहतील.
या जागांवर ओबीसी उमेदवारांना संधी मिळणार आहे. नवीन चार सदस्यीय प्रभाग रचनेत हे आरक्षण कशा पद्धतीने पडणार याकडे ओबीसी उमेदवारांचे लक्ष असणार आहे. कोल्हापूर महापालिका सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० रोजी संपली. नवीन सभागृह अस्तित्वात येण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणूक प्रक्रीया जून २०२० पासूनच राबविण्यात येत होती. मात्र याचवर्षी कोरोनाची जागतिक महामारी सुरु
झाल्याने राज्यातील सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. कोरानाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रभाग रचना निश्चित करुन आरक्षण प्रक्रीया राबविली गेली. निवडणुका लांबणीवर असल्याने न्यायालयाने ऑक्टोबर २०२५ पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सध्या जि. प. महापालिका निवडणुकीची तयारी सुरु आहे.
महापालिका प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले असताना सोमवार ४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणसह निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत ओबीसींचे २७ टक्के आरक्षण कायम राहणार आहे. त्यानुसार ओबीसींना २१ अथवा २२ जागा मिळण्याची शक्यता आहे.
ओबीसींना मिळणार २२ जागा
२०२२ मध्ये महापालिकेची निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार होती. त्यावेळी ३१ प्रभाग व नगरसेवकांची संख्या ९२ करण्यात आली होती. यावेळी आरक्षण सोडतपर्यंत प्रक्रिया झाली होती. यावेळीही ओबीसींना २२ जागा मिळाल्या होत्या. मात्र अंतिम टप्यात ही प्रक्रिया थांबली.
यानंतर आता २०२५ मध्ये पुन्हा महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र आता चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार शहरात २० प्रभाग होणार आहेत. यामध्ये आता ओबीसी आरक्षण कसे पडणार याकडे लक्ष असणार आहे. मात्र यानंतर न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या. त्या अद्यापही झालेल्या नाहीत.