For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अधिवेशनात आरक्षणाला न्याय द्या; अन्यथा मंत्र्यांना कोल्हापुरात घेराओ : सकल मराठा समाजाचा इशारा

04:47 PM Dec 07, 2023 IST | Abhijeet Khandekar
अधिवेशनात आरक्षणाला न्याय द्या  अन्यथा मंत्र्यांना कोल्हापुरात घेराओ   सकल मराठा समाजाचा इशारा
Kolhapur Maratha society reservation
Advertisement

आज मराठा आरक्षणाचा जागर

कोल्हापूर प्रतिनिधी

हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आज, गुऊवारपासून सुऊ होणार आहे. या अधिवेशनामध्ये मराठा मंत्री व आमदारांनी मराठा आरक्षणावर चर्चा कऊन न्याय द्यावा, अन्यथा अधिवेशनानंतर मंत्र्यांना कोल्हापुरात घेराओ घातला जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक व अॅड. बाबा इंदुलकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. तसेच आरक्षणासंदर्भात सरकार, राज्यकर्ते व लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी आज, गुऊवारी सकाळी 11.30 वाजता दसरा चौकात ‘मराठा आरक्षणाचा जागर’ आयोजित केला आहे, यावेळी मराठा समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Advertisement

मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात साखळी धरणे आंदोलन सुऊ आहे. या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वसंतराव मुळीक म्हणाले, हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आमदारांनी सक्रीय सहभाग घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा करणे गरजेचे आहे. याबाबत समस्त मराठा समाजाची तीव्र भावना आहे. अधिवेशनामध्ये सरकारने टिकाऊ आरक्षण कसे देणार ? याबाबतची भूमिका स्पष्ट करावी. त्याचबरोबर सरकारला व राज्यकर्त्यांना मराठा आरक्षणाबाबत जाग आणण्यासाठी आज, गुऊवारी कोल्हापूरात गेंधळींच्या माध्यमातून जागर आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापुरातील संस्था, तालीम संस्थांचे पदाधिकारी व समाजबांधवांनी उपस्थित राहून सरकारला ताकद दाखवावी.

बाबा इंदुलकर म्हणाले, मराठा आरक्षण 2014 व 2018 ला मिळूनही ते कायदेशीरदृष्ट्या टिकले नाही. आताही सरकारने आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु ते कायद्याच्या आधारे कसे ? देणार हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनसंपेपर्यंत सरकारने राज्यातील मराठा आरक्षण चळवळीतील समन्वयक वकिलांसोबत सरकारने बैठक घेऊन न्यायालया टिकणारे आरक्षण कसे देणार ? हे स्पष्ट करावे. अन्यथा तीव्र आंदोलनाची सुऊवात कोल्हापूरातून केली जाईल. अधिवेशनानंतर कोल्हापुरात येणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्यांना घेरोओ घातला जाईल.

Advertisement

विजय देवणे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्यांनी एकमेकाकडे बोट दाखविण्याचेच काम केले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आपली स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. अधिवेशनामध्ये कोल्हापूरच्या आमदारांनी आरक्षणाबाबत भूमिका मांडावी.

बाबा पार्टे म्हणाले, अधिवेशनामध्ये आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास मराठा आमदारांनी राजिनामा द्यावा. अन्यथा त्यांची गाठ कोल्हापूर सकल मराठा समाजाशी आहे हे लक्षात घ्यावे. सुभाष जाधव म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी मराठा आमदारांनी प्रसंगी अधिवेशन बंद पाडून सरकारचे लक्ष वेधावे.

यावेळी चंद्रकांत पाटील, संपतराव चव्हाण-पाटील, संभाजीराव जगदाळे, राजेश तोरस्कर, उदय लाड, महादेव पाटील, फिरोजखान उस्ताद, सुशील भांदीगरे, संभाजी खोत, सुनीता पाटील, गीता हसूरकर, पद्मावती पाटील, शैलजा भोसले आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.