For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रचारसभेला येणारच...विजयीसभेलाही येणार ! कोल्हापूर दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांची घेतली गळाभेट

05:47 PM Mar 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
प्रचारसभेला येणारच   विजयीसभेलाही येणार   कोल्हापूर दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांची घेतली गळाभेट
Uddhav Thackeray met Rich Shahu Maharaj Chhatrapati
Advertisement

लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण महाराष्ट्राच्या दौरा करत असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूरात श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महाराजांच्या बरोबर तासभर चर्चा केली असून कोल्हापूरातील राजकिय घडामोडी आता वेग घेण्याच्या शक्यता आहेत. शाहूमहाराजांनी उद्धव ठाकरे यांनी अलिंगन देऊन त्यांची गळाभेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत, तेजस ठाकरे, मिलिंद नार्वेकर, मालोजीराजे छत्रपती, मधुरीमाराजे छत्रपती उपस्थित होत्या.

Advertisement

हेही वाचा >>>प्रचारसभेत येणारच..पण विजयसभेतही येणार- उद्धव ठाकरेंनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना दिले आश्वासन

Advertisement

काँग्रेसकडून लोकसभेच्या कोल्हापूरच्या जागेसाठी शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली आहे. काँग्रेसने शाहू महाराज यांना उमेदवारी देऊन एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. यामुळे महाविकास आघाडीलाही ताकद मिळाल्याचे राजकिय विश्लेषकांनी मान्य केलं आहे.

महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे कोल्हापूरची जागा असल्याने महाराजांनी शिवसेनेच्या तिकिटावर हि निवडणुक लढावी असा आग्रह शिवसेनेतून केला गेला होता. पण जिल्ह्यात काँग्रेसची ताकत पहाता जागावाटपामध्ये कोल्हापूरची जागा ही काँग्रेसच्या वाट्याला देण्यात आली.

आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरातील नविन राजवाड्यावर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. भेटीनंतर माध्यमांशी चर्चा करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "कोल्हापूरचे शाहू छत्रपती महाराज आणि ठाकरे घराण्याचे ऋणानुबंध आमच्या आजोबापासून आहेत. मला आनंद आहे याही पिढीत आमचे संबंध घनिष्ठ राहतील. शिववसैनिक पूर्ण ताकादीने महाराजांना विजयी करतील...मी महाराजांना वचन दिलंय...आम्ही प्रचाराला तर येणारच पण विजयीसभेलाही येणार." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

पुढे बोलताना ते म्हणाले, "या भेटीत मी माझाही स्वार्थ साधलेला आहे. जो संघर्ष आम्ही लढतो आहे त्यात विजय मिळावा यासाठी त्यांचा आशीर्वादही मी घेतला आहे." असे ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.