जिल्ह्यात उत्स्फुर्तपणे मतदानाला सुरवात! मतदान केंद्रावर सकाळपासून गर्दी; जाणून घ्या आकडेवारी
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया देशभरात राबवल्या जात आहेत. आज लोकसभा निवडणुकांच्या तिसरा टप्प्याला सुरवात होत असून महाराष्ट्रातील ९ मतदारसंघासाठी मतदान या टप्प्यात होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीसह सातारा हातकणंगले, आणि सोलापूर लोकसभेच्या जागेवर पुर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागून राहील्या आहेत.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीच्या असलेल्या मतदानासाठी नागरीकांनी आज सकाळपासून मतदानकेंद्रावर रांगा लावलेल्या दिसून येत आहे. या मतदानासाठी नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क प्रथमच बजावला असून त्यांचा उत्साह प्रत्येक मतदान केंद्रावर दिसून येत आहे. शहरी भागात आज सकाळी मॉर्निंग वॉक तसेच फिरायला गेलेल्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच नोकरी आणि जॉब साठी बाहेर पडणाऱ्या तरूणाईने सकाळी लवकर मतदान करूनच घराच्या बाहेर पडण्यास पसंती दिली.
ताज्या आलेल्या आकडेवारीनुसार संपुर्ण महाराष्ट्रात सकाळी ९ वाजेपर्यतं ६.६४ टक्के मतदान झाल्याची माहीती समोर येत आहे. तर कोल्हापूरात सकाळी ९ वाजेपर्यंत ८.०४ टक्के उतके झाले. त्यानंतर आकरा वाजेपर्यत या मतदानामध्ये उत्स्फुर्त वाढ होऊन ते सुमारे २० टक्क्यांवर गेले. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये सकाळी ९ वाजेपर्यत सगळ्यात जास्त म्हणजे ११ ट्क्के मतदान झाले तर चंदगड तालुक्यात ५. ६० टक्क्यांपर्यंत लोकांनी मतदान केले.
कोल्हापूर मतदारसंघात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत 23.77 टक्के मतदान झाले आहे.
चंदगड- 271- 20.56 टक्के
कागल- 273- 23.18 टक्के
करवीर -275- 31.95 टक्के
कोल्हापूर उत्तर 276- 23.24 टक्के