बिद्रीत कबर बांधणाऱ्यांच्या सोबत राहणार का ? माजी आमदार मालोजीराजे यांचा सवाल
बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत ज्यांनी तुमची कबरी बांधण्याची भाषा केली, त्यांनाच तुम्ही लोकसभेला निवडून देणार का असा सवाल माजी आमदार मालोजीराजे यांनी केला. मालोजीराजे म्हणाले, बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत बोलताना खासदार मंडलिक असे म्हटले होते की, हमीदवाडा कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही पूर्वी काहीं लोकांच्या कबरी बांधल्या आहेत. त्याचा धडा शिकता आला नाही तर बिद्री मध्ये देखील कबरी बांधू. पण ज्यांच्या कबरी बांधायच्या भाषा करता, त्यांच्यावर तुम्हाला लोकसभेत निवडून आणण्याची जबाबदारी आली आहे. आता, त्या लोकांनी निर्णय घेण्याची वेळ आली आहे, की, ज्यांनी कबरीची भाषा केली त्यांच्यासोबत रहायचे का, याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
हमीदवाडा कारखान्यावर काय बोलला तर एकेकांच्या कबरी बांधल्या जातील असा इशारा बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत देणारे खासदार आज मात्र बिद्री च्या सत्ताध्रायांच्या हातात हात घालून मतांसाठी एकत्र फिरत आहेत, पण त्यांची वाक्ये जनता अजूनही विसरलेली नाही असा टोला माजी आमदार मालोजीराजे यांनी मारला.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ सावडे बुद्रुक तालुका कागल येथे जाहीर सभेत बोलत होते अध्यक्षस्थानी महादेव अस्वले हे होते..
मालोजीराजे छत्रपती पुढे , ज्यांनी संसदेत कधीही तोंड उघडले नाही.एखादा मोठा प्रोजेक्ट कोल्हापूर जिह्यात आणला नाही. ज्यांना स्वत?चाच दूध संघ विकावा लागला. कारखान्यावर कर्ज वाढले कर्ज काढून कर्मच्रायांचे पगार द्यायची वेळ आली .ज्यांना कारखान्याची शेवटची संचालक मंडळाची बैठक कधी झाली हे आठवत नाही .ज्यांनी नुकत्याच झालेल्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत ज्यांच्या कबरी बांधायची भाषा केली त्यांच्याच हातात हात घालून मतांसाठी फिरत आहेत अशा निक्रिय खासदार संजय मंडलिक यांची निक्रिय कारकीर्द बदलवायची हीच वेळ आहे.
माजी आमदार संजय बाबा घाटगे म्हणाले, भाजपचे सरकार हे केवळ उद्योगपतींसाठीच काम करताना दिसत आहे याचे उदाहरण म्हणजे 370 कलम हटवून साडेतीन हजार एकर जमीन आदानींना देण्यात आली यामध्ये लिथेनियम मिळत असून ते इलेक्ट्रिक बॅटरी साठी उपयोगी पडते . जुन्या संसदेत कामकाज करणारा तिस्रयांदा पंतप्रधान होत नाही असे भाकीत कुणीतरी सांगितले म्हणून गोमुख संसद 20 हजार कोटी खर्चून बांधण्यात आली असे अंधश्रद्धा जातीयता समाजात तेढ निर्माण करणारे हे भाजप सरकार आणि त्यांची संस्कृती आत्ताच संपवण्याची गरज आहे.
अमरीश घाटगे म्हणाले कुणीतरी मुरगुड चे दिवटे शाहू महाराजांनी काय केले असे विचारत आहेत परंतु त्यांनी पाच वर्षात काय केले? याउलट शाहू महाराजांनी राधानगरी चे वस्तीगृह,परिते येथे 27 एकर मोफत जमीन, चिखली येथे चौदाशे प्लॉट मोफत दिले .कागल मध्ये ही 1640 कुटुंब आज शाहू महाराजांनी दिलेल्या जमिनीवरच जगत आहेत.केवळ नावाने नाही तर कृतीनं त्यांनी शाहू महाराजांचा कार्य तळागाळापर्यंत पोहोचवले आहे जरांगे आंदोलन, ऊस आंदोलन ,कोल्हापूरचा टोल यामध्ये तर त्यांनी सहभाग नोंदवलाच आता शक्तीपीठ महामार्ग घालवायचा असेल तर शाहू महाराजा शिवाय पर्याय नाही .काहीही काम केले नसल्यामुळेच खोके घेणारे आणि खोके देणारे आज गल्लीबोळातून मतांची भीक मागत फिरत आहेत .
कार्यक्रमात वंचित चे राज कांबळे, कॉम्रेड शिवाजी मगदूम, विकास पाटील, शिवानंद माळी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नाना कांबळे, उमाजी पाटील, सागर कोंडेकर, हळदीचे व्हरंबळे मधुकर भोसले आदी प्रमुख उपस्थित होते सूत्रसंचालन सुभाष पाटील तर आभार एस .टी. चव्हाण यांनी मानले ..