महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकसभेच्य़ा कोल्हापूरच्या उमेदवारी संदर्भात मातोश्रीवर मुलाखती; ठाकरे गटाचे नेते मुंबईला रवाना

02:25 PM Nov 16, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून चाचपणी सुरु असून त्यासंदर्भात मातोश्रीवर आज बैठक होणार आहे. आजच्या बैठकीमध्ये कोल्हापूरच्या जागांसंदर्भात आढावा बैठक घेतली जाणार असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे.

Advertisement

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी जवळ जवळ सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. शिवसेना ठाकरे गटानेही राज्यातील विविध जागांसंदर्भाच चाचपणी सुरु केली आहे. आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूरच्या जागांसंदर्भात आढावा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीमध्ये इच्छुक उमेदवारांची मुलाखतीही घेतल्या जाणार आहेत.
या बैठकीसाठी जिल्ह्यातील अनेक शिवसेना नेते मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख व उपनेते संजय पवार हे सुद्धा मुंबईला रवाना झाले असून कोल्हापूरचे तिकिट त्यांनाच मिऴण्याच्या शक्यता आहेत. त्याचबरोबर लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून उपसंपर्कप्रमुख विजय देवणे, गोकुळचे संचालक चेतन नरके हेसुद्धा इच्छुक आहेत.

Advertisement

Advertisement
Next Article