Kolhapur Live In Relationship खून प्रकरणातील आरोपी सतीश यादवची आत्महत्या
प्रियसीचा खून करणाऱ्या प्रियकरानेच गळफास घेवून आत्महत्या केलीये
कोल्हापूर : लिव-इन रिलेशनशिपमधून प्रियसीच्या खूनाची धक्कादायक घटना मंगळवारी कोल्हापुरातील सरनोबतवाडी येथे घडली. आता या बातमीसंदर्भात आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या घटनेतील प्रियसीचा खून करणाऱ्या प्रियकरानेच गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
याप्रकणातील आरोपी सतीश मारुती यादव (वय 28, मूळ रा. उंड्री, ता. पन्हाळा) याचा मृतदेह शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे येथे झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. दरम्यान, लिव्ह इनमध्ये राहणारी प्रेयसी समीक्षा भारत नरसिंगे (वय 23, रा. जयभवानी गल्ली, कसबा बावडा, कोल्हापूर) हिचा चाकूने भोसकून खून करून सतीश मारुती यादव पसार झाला होता. तसेच त्याचा मोबाईल बंद असल्याने त्याला ट्रेस करणे पोलिसांना अवघड जात होते.
बुधवारी पोलिसांनी सतीशचा शोध घेण्यासाठी दोन ठिकाणी छापे टाकूनही तो सापडला नाही. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसी समीक्षा हिचा सतीश यादव याने मंगळवारी (दि. 3) दुपारी सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात भोसकून खून केला होचा. त्यामुळे त्याच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके कार्यरत होती.
तो काम करीत असलेल्या ठिकाणी शिवाजी पेठेतील एका क्लबमध्ये आणि गावाकडे छापा टाकून पथकांनी शोध घेतला. शोध सुरु असताना पोलिसांना त्याने गळफास लावून घेतल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, मृत समीक्षाचे रक्ताने माखलेले कपडे, गुह्यातील चाकू जप्त केला. लवकरच आरोपीस पकडण्यात यश येईल असा विश्वास पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी व्यक्त केला.
समीक्षाचे कुटुंब भेदरलेलेच
समीक्षाच्या खूनामुळे सानिकाची आई,दोन भावंडे अद्यापही भेदरलेल्या अवस्थेत आहेत. तिच्या आईला मोठा धक्का बसला आहे.नातेवाईक आणि गल्लीतील नागरिक त्यांना धीर देत आहेत.