Kolhapur : पत्नीच्या डोक्यात घन घालून खून करणाऱ्यास जन्मठेप
जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा
वारणानगर / प्रतिनिधी
मसूद माले ता. पन्हाळा येथे तीन वर्षांपूर्वी पत्नीच्या डोक्यात घन घालून खून केलेल्या पतीला जिल्हा सत्र न्यायाधीश एस.आर. साळोखे यानी जन्मठेफेसह दंडाची शिक्षा सुनावली.दत्तात्रय आनंदा पाटील वय ३७, रा. माले असे आरोपीचे आहे.
माले येथील खंडोबा मंदीर जवळ राहणाऱ्या दत्तात्रय पाटील यांच्यात व पत्नी शुभांगी यांच्यात विवाह झाले पासूनच पत्नीला थोडे कमी ऐकू येत असल्याच्या कारणामुळे वारवांर दोघांमध्येही होणाऱ्या भांडणातून आलेल्या रागातून दि. २५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास बायकोच्या डोक्यात घनाचे सलग चार घाव घालून खून केल्याची घटना घडली होती याप्रकरणी आरोपी दत्तात्रय याचे विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात भा.द.वि.स. ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल होऊन सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
या गुन्ह्याचा तपास कोडोली पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे पैरवी अधिकारी एस. एस. कोळी पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी खोत यानी केला होता या प्रकरणी मालेतील २१ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी दत्तात्रय च्या शेजारी राहणारे सर्व साथीदार फितुर झाले.
याप्रकरणी आरोपीचे मुले मयत शुभांगी चे आई, भाऊ, अन्य नातेवाईक व पेट्रोल पंपावरील साक्षीदार यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर. साळोखे यानी आरोपी दत्तात्रय पाटील यास दोषी ठरवून जन्मठेप व रक्कम रु.५००० दंड, दंड न भरलेस तीन महिने साधी कैद अशी शिक्षा आज मंगळवार दि. ७ रोजी सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अँड मंजुषा पाटील यानी काम पाहिले.