महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुचाकीस्वाराच्या धडकेने वयोवृद्ध सायकलस्वार जागीच ठार : दुचाकी स्वार पोलीसांच्या ताब्यात

01:58 PM Mar 01, 2024 IST | Abhijeet Khandekar
kolhapur kekhale
Advertisement

वारणानगर / प्रतिनिधी

कोडोली - वाठार राज्य मार्गावरील वारणानगर ता. पन्हाळा येथील वारणा सिमेंट पाईप कारखान्यांचे जवळ अज्ञात दू चाकी स्वाराने पाठीमागून धडक दिल्याने सायकल वरील वृद्ध ठार झाला. नारायण गोविंद पाटील वय ६७ रा. केखले ता. पन्हाळा असे त्यांचे नाव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे.

Advertisement

या बाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, नारायण पाटील हे सायकल वरून केखले येथून द. पाडळी ता. हातकणंगले येथील नातेवाईकांचे उत्तरकार्य आटोपून ते एकच्या दरम्यान परत येत असताना वारणा सिमेंट पाईप कारखान्याजवळ अज्ञात दू चाकी स्वाराने त्यांना पाठीमागून धडक दिल्याने ते डांबरी रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले. त्या अवस्थेत त्यांना कोडोली उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देणेत आला.

Advertisement

यातील मृत नारायण पाटील यांच्या जवळ ओळखीचा कोणताही पुरावा नव्हता त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीन झाले यासाठी मृताचा फोटो पोलीसांनी सोशल मिडीयाच्या ग्रुपवर टाकला असता केखले येथील पत्रकार बाबा माने यांना प्रथम ओळख पटली त्यांनी नातेवाईकांना कळवले याच दरम्यान मृत नारायण पाटील यांना धडक देणाऱ्या दुचाकी स्वाराचा शोध लागला बिकास पदम बोहरा मूळ नेपाळ सद्या रा. पारगांव हा किरकोळ जखमी झाला होता उपचारा नंतर पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.सहा. पोलीस निरीक्षक कैलास कोडग हावलदार प्रशांत संकपाळ तपास करीत आहेत. मृत नारायण पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.

Advertisement
Tags :
kolhapur kekhaletwo-wheeler
Next Article