महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुरूवर्यांचा आशीर्वाद हीच माझ्या विजयाची नांदी! शिक्षकांचा भव्य मेळावा! राहुल पाटील यांनी व्यक्त केल्या भावना

06:34 PM Oct 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

करवीर ,पन्हाळा , गगनबावडा शिक्षक सेवावृत्ती कार्यक्रमा प्रसंगी प्रतिपादन

Advertisement

कसबा बीड / वार्ताहर 

Advertisement

फुलेवाडी येथील दत्त मंगल कार्यालयात दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांचे सुपूत्र, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचे समर्थनार्थ करवीर विधानसभा मतदारसंघातील शिक्षकांचा भव्य मेळावा करवीर पंचायत समितीचे माजी सभापती बी.एच.पाटील यांचे अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना राहूल पाटील म्हणाले, सर्व गुरूवर्यांचा आशीर्वाद ही माझ्यासाठी पुण्याईची संचित म्हणावे लागेल.येणारी निवडणूक तुम्हां सर्वांच्या हातात असून वडीलकीच्या नात्याने मिळालेलं आपलं सर्वांचं समर्थन आज पी.एन.पाटील साहेब यांची उणीव भरून काढण्याचं काम करेल. तुमचा विश्वास सार्थ करून गोरगरीबांचं शिक्षण व शाळा वाचविण्यासाठी कटिबद्ध राहीन असेही आश्वासन त्यानी उपस्थित शेकडो शिक्षकांना दिले.

शिक्षक नेते प्रसाद पाटील, एस.व्ही.पाटील, कृष्णात कारंडे, ए.के.पाटील,डी.जी.पाटील, निवास पाटील, संजय कुर्डूकर, एम.आर.कांबळे व संतोष गायकवाड यांनी आपले विचार मांडताना उपस्थित शिक्षकांना पी.एन.पाटील यांचे आठवणीबरोबर राहुल पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहन केल.

यावेळी गोकुळ दुध संघाचे संचालक व माजी शिक्षण सभापती बाळासाहेब खाडे, बाजार समितीचे संचालक व माजी चेअरमन भारत पाटील, भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील, शिरोलीचे सरपंच सचिन पाटील व पी.एन.पी.फौंडेशनचे अध्यक्ष प्रा.ए.डी.चौगले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उत्कृष्ठ संयोजन धनाजी पाटील,जे.डी.कांबळे, एम.एस.चव्हाण व एकनाथ कुंभार यांनी केले. सुत्रसंचालन प्रियदर्शिनी पाटील, स्वागत संदीप पाडळकर, प्रास्तावीक धनाजी पाटील तर आभार गजानन मोरे यांनी मानले.

Advertisement
Tags :
Kolhapur karveer mla PN patil Rahul Patil melawa
Next Article