For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Breaking : निपाणीच्या दोन युवकांवर काळम्मावाडी येथे काळाचा घाला! दुधगंगा नदीमध्ये बुडून दोघांचा मृत्यु

03:22 PM Jul 01, 2024 IST | Abhijeet Khandekar
kolhapur breaking   निपाणीच्या दोन युवकांवर काळम्मावाडी येथे काळाचा घाला  दुधगंगा नदीमध्ये बुडून दोघांचा मृत्यु
Kolhapur Kalammawadi Nipani
Advertisement

राधानगरी/प्रतिनिधी

निपाणी (कर्नाटक)येथील 12 वीचे 13 वर्गमित्र हे काळम्मावाडी,ता, राधानगरी येथे वर्ष पर्यटनसाठी आले होते. त्यातील गणेश चंद्रकांत कदम (वय १८ रा. आंदोलननगर निपाणी ) हा युवक पोहता येत नसताना काळम्मावाडी धरणासमोरील दूधगंगा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात उतरला त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो डोहात बुडू तो बुडत असताना गाडीचा ड्रायव्हर प्रतीक पाटील वय वर्ष 22 हा त्याला वाचवण्यासाठी गेला असता तोही पाण्याचा प्रवाहात वाहून गेला आहे.

Advertisement

आज दुपारी 12च्या सुमारास घडली. त्या घटनास्थळी राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक खंडू गायकवाड, पोलीस भैरवनाथ पाटील, रघुनाथ पोवार बचावकार्यातील जयशिंग किरुळकर धोंडीराम राणे हे नदी पात्रात उतरून शोध कार्य चालू आहे. पाऊस जास्त असल्याने पाण्याचा प्रवाह वाढतंच आहे. त्या मुळे बचाव पथकाला अडथळा निर्माण होत आहे. अद्याप दोघांने मृत देह सापडले नसून शोध कार्य चालू आहे. घटनास्थळी बघ्यानी गर्दी केली आहे अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.