For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडित्रेच्या यशवंत बँकेत सत्तांतर -श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलला १९ जागा तर विरोधी संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनलला केवळ २ जागांवर विजयी

08:32 PM Dec 25, 2023 IST | Abhijeet Khandekar
कुडित्रेच्या यशवंत बँकेत सत्तांतर  श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलला १९ जागा तर विरोधी संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनलला केवळ २ जागांवर विजयी
Advertisement

 वाकरे वार्ताहर

Advertisement

कुडित्रे (ता. करवीर) येथील श्री यशवंत सहकारी बँकेच्या अत्यंत चुरशीने झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्थापक शंकरराव पाटील यांचे पुतणे अमर पाटील (शिंगणापूरकर) आणि माजी अध्यक्ष अँड. प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील "श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलने" सत्तांतर घडवले, या पॅनेलला २१ पैकी १९ जागा मिळाल्या तर बँकेचे विद्यमान अध्यक्ष एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखालील "संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनलला" अवघ्या २ जागांवर विजय मिळवता आला.

 कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कुंभी कासारी परिसरातील करवीर, पन्हाळा, गगनबावडा, शाहुवाडी, राधानगरी या तालुक्यातील सभासदांचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले होते.या बँकेच्या निवडणुकीसाठी रविवार दि २४ रोजी मतदान झाले होते.१८०२७ मतदारांपैकी  १२,६२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.चुरशीने ७०.०४.टक्के मतदान झाले होते. 

Advertisement

कर्मचारी कल्याण निधी, बहुउद्देशीय इमारत, कसबा बावडा येथे सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला.४२ टेबलवर २२५ कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. एकूण ४२ मतदान केंद्रांवर मतदान झाले होते, त्यामुळे एकाच वेळी या सर्व मतदान केंद्रांवरील सर्वसाधारण गट ,महिला,इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती भटक्या व विमुक्त जाती जमाती या प्रवर्गातील मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला. मतपत्रिकेची विभागणी केल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास पॅनल टू पॅनल मतदानाची मोजणी करण्यात आली. यामध्ये ५९६५ मतदानांपैकी ३१०७ मतदान शाहू पॅनेलला तर २८५८ मतदान सत्तारूढ यशवंत पॅनलला मिळाले होते. पॅनल टू पॅनल मतदानामध्ये विरोधी शाहू आघाडीने अडीचशे मतांचे मताधिक्य घेतले होते.करवीर तालुक्यातील मतदानात दोन्ही आघाड्यांना समसमांतर मतांचा कौल दिसत होता,तर पन्हाळा तालुक्याने विरोधी शाहू आघाडीला मताधिक्य दिले. त्यानंतर क्रॉस वोटिंग झालेल्या सुमारे सात हजार मतदानाची मतमोजणी सुरू करण्यात आली .करवीर तालुक्यात दोन पॅनलमध्ये मतांची चढाओढ सुरू होती. पॅनल टू पॅनल आणि क्रॉस वोटिंग मतमोजणीनंतर सायंकाळी पाचच्या सुमारास संपूर्ण निकाल घोषित करण्यात आला. या निकालात विरोधी राजर्षी शाहू आघाडीने सर्वसाधारण गटातील १४, महिला गटातील २, इतर मागासवर्गीय गटातील १, अनुसूचित जाती गटातील १ व भटक्या विमुक्त जाती जमाती गटातील १ अशा १९ जागा जिंकल्या, तर अखेरच्या टप्प्यात सत्तारूढ यशवंत पॅनलचे प्रमुख व विद्यमान अध्यक्ष एकनाथ पाटील व उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर यांनी मुसंडी मारत विजय मिळवल्याने शाहू आघाडीच्या हिंदुराव लक्ष्मण दरेकर आणि मानसिंग विलासराव भोसले यांना पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत विजयी राजर्षी शाहू पॅनेलला माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक विश्वास पाटील ,बाळासो खाडे, राजेंद्र सूर्यवंशी यांचे पाठबळ लाभले होते,त्यामुळे या आघाडीचा विजय सुकर झाला. गेल्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाने एकनाथ पाटील यांच्या सत्ताधारी आघाडीला पाठिंबा दिला होता. निकाल घोषित झाल्यानंतर विजय विजय शाहू पॅनेलच्यावतीने उघड्या जीपमधून अमर पाटील, प्रकाश देसाई यांच्यासह उमेदवारांनी मिरवणूक काढून गुलालाची उधळण फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक सुनील धायगुडे यांनी काम पाहिले.त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नितीन माने,उदय उलपे, मिलिंद ओतारी यांचे सहकार्य लाभले.करवीरचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे

सर्वसाधारण

१) प्रकाश पांडुरंग देसाई (देसाईवाडी)  ६३४७

२) भगवंत दत्तू पाटील (वाकरे) ६३०५

३) सर्जेराव बाबूराव शेलार ( कुडित्रे ) ६१६३

४)  कुंडलिक महादेव पाटील (वाकरे) ६०६९

५) प्रल्हाद ज्ञानदेव खाडे (सांगरुळ)  ६०५३

६) विश्वास राऊ पाटील (कोपार्डे) ६०४५

७) दिलीप रंगराव खाडे (सांगरुळ) ६०२७

८) दत्तात्रय कृष्णा पाटील (कुडीत्रे) ६०२३

९) मधुकर सोनबा पाटील (हणमंतवाडी) ५९४८

१०) कुलभूषण अनिल पाटील (कोपार्डे) ५९०१

११) महेश दिनकर पाटील (शिंगणापूर) ५८५७

१२) चंद्रकांत दत्तात्रय पाटील (साबळेवाडी) ५८३२

१३) जयसिंग यशवंत सूर्यवंशी (कसबा बीड) ५७८६

१४) नंदकुमार उर्फ कृष्णात आण्णासो पाटील (शिरोली दुमाला)  ५४७१

महिला प्रतिनिधी

१) शोभा सुरेश करपे (वाकरे) ६३९४

२)  मंगल तुकाराम पाटील (खाटांगळे) ६०८६

इतर मागासवर्गीय

महेश मधुकर पाटील (पाडळी खुर्द) ६५१४

अनुसूचित जाती जमाती

 युवराज ज्ञानु कांबळे (पोर्ले) ६५७५

भटक्या विमुक्त जाती जमाती

बाबुराव भाऊसो रानगे (सावरवाडी) ६७८८

संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :

१) एकनाथ चित्राप्पा पाटील (कुडित्रे) ६००९

२)  हिंदुराव तुकाराम तोडकर (वाकरे) ५७५६

Advertisement

.