महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हा सहकार बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅङ प्रबोध पाटील यांची निवड

06:34 PM Jul 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
Bar Asso Kolhapur election
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा सहकार बार असोसिएशनची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅङ किरण मुंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नुतन सदस्यांच्या बैठकीत असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव यांची निवड करण्यात आल्याने, असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅङ प्रबोध पाटील तर उपाध्यक्षपदी अॅङ भरत घोरपडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

Advertisement

जिल्हा सहकार बार असोसिएशनची अन्य कार्यकारणी अशी, सचिव अॅङ विशाल सरनाईक, सहसचिव अॅङ अमोल पाटील, लोकल ऑडिटर अॅङ मनोज कदम, महिला प्रतिनिधी अॅङ अनुजा भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी सहकार बार असोसिएशनचे सिनियर अॅङ के.डी.पवार, अॅङ संदीप घाटगे, अॅङ सर्जेराव खोत, अॅङ उमेश माणगावे, अॅङ अभिजित कापसे, अॅङ संजय डिक्रुज, अॅङ राहुल देसाई, अॅङ नामदेवराव साळोखे, अॅङ प्रशांत पाटील, अॅङ सागर संकपाळ, अॅङ अंकुश भांदिगरे, अॅङ शिवानी पोवार, अॅङ जगजीत अडनाईक उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी सहकार क्षेत्रातील वकिलांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

Advertisement

Advertisement
Tags :
Kolhapur District Co-operativeKolhapur District Co-operative Bar Associationkolhapur news
Next Article