For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुर्ववैमनस्यातून सराईत गुंडाचा दगडाने ठेचून खून; निर्माण चौक येथील घटना, दोघांना अटक

11:27 AM Dec 01, 2023 IST | Abhijeet Khandekar
पुर्ववैमनस्यातून सराईत गुंडाचा दगडाने ठेचून खून  निर्माण चौक येथील घटना  दोघांना अटक
Kolhapur Crime murder
Advertisement

शुभम पाटील संशयीत आरोपी : संग्राम पाडळकर, शुभम मोरे

कोल्हापूर प्रतिनिधी

पुर्ववैमनस्यातून सराईत गुंडांचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. शुभम अशोक पाटील उर्फ पाव ( वय 28 रा. रामानंद नगर) असे मृताचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास निर्माण चौक येथील निर्जनस्थळी ही घटना घडली. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी शुभम उर्फ बंडा प्रकाश मोरे (वय 25 आयसोलेशन हॉस्पिटल नजीक, नेहरुनगर), संग्राम रंगराव पाडळकर (वय 26 रा. पाडळकर कॉलनी हॉकी स्टेडियमजवळ) या दोघा संशयितांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. गुरुवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान खुनातील दगड राजवाडा पोलिसांनी जप्त केला.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, शुभम पाटील व शुभम मोरे शेजारी राहण्यास होते. यावेळी या दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. यातूनच शुभम पाटीलने मोरेच्या घरी जावून त्याला मारहाण केली होती, तसेच त्याच्या नातेवाईकांनाही दमदाटी केली होती. याबाबतचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात 2019 मध्ये दाखल झाला होता. शुभम पाटील याच्याविरोधात मोरेच्या नातेवाईकांनी तक्रार दिली होती. यानंतर या दोघांमधील वाद मिटला होता. बुधवारी रात्री शुभम पाटील, शुभम मोरे व संग्राम हे तिघे संभाजीनगर येथील एका बारमध्ये दारु पीत बसले होते. यावेळी मोरे व पाटील यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. यानंतर हे तीघेही बारमधून बाहेर पडले. निर्माण चौक येथे आले असता, या दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. याचे पर्यावसन मारामारीत झाले. यावेळी शुभम मोरेने शुभमला लाथाबुक्यांनी मारहाण करुन जमिनीवर पाडले. तर संग्रामने शुभमला धरुन ठेवले. हीच वेळ साधत शुभम मोरे याने शुभम पाटीलच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. यानंतर पुन्हा त्याच दगडाने दोन ते तीन वेळा हल्ला केला. शुभम पाटील मृत झाल्याचे लक्षात येताच दोघांनीही घटनास्थळावरुन पलायन केले. यानंतर हे दोघे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजर झाले. दरम्यान मैल ख•ा येथे खून झाल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळली. पोलीस निरीक्षक सतीश गुरव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, प्रीतमकुमार पुजारी, संतोष गळवे, गौरव शिंदे, प्रशांत घोलप यांनी धाव घेतली. घटनास्थळी परिसरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.

मयत, संशयीत रेकॉर्डवरील आरोपी
मयत शुभम पाटील हा 2012 मध्ये रेणुका मंदिर येथे झालेल्या मर्डरमधील संशयीत आरोपी होता. त्यावेळेस तो अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. तर शुभम मोरे याच्यावरही पोक्सोसह तीन ते चार गुन्हे दाखल आहेत. संग्राम पाडळकर याच्यावर जबरी चोरी, मारहाण करणे असे गुन्हे दाखल आहेत.

Advertisement

बारमध्ये बसून ढोसली दारु
शुभम पाटील, शुभम मोरे, व संग्राम पाडळकर हे तिघे बुधवारी दिवसभर एकत्र होते. सायंकाळी 7 वाजल्यापासून तिघेही संभाजीनगर येथील इंदिरासागर बारमध्ये दारु प्राशन करत बसले होते. यानंतर ते चालत घरी निघाले होते. निर्माण चौक येथे लघुशंकेसाठी थांबले असता शुभम पाटील व शुभम मोरे यांच्यामध्ये वाद सुरु झाला. हा वाद टोकला गेला. या दोघांमध्ये मारामारी सुरु झाली. यात संग्रामने शुभम पाटीलला धरुन ठेवले. याचदरम्यान रस्त्याकडेला पडलेला एक मोठा दगड शुभम मोरेने शुभम पाटीलच्या डोक्यात घातला. यानंतर पुन्हा तीन ते चार वेळा डोक्यात दगड घातल्याने शुभमच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता.

रात्री उशिरा शवविच्छेदन
दरम्यान रात्री उशिरा शुभम पाटील याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शुभमच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या आई, वडीलांनी केलेला आक्रोश हदयपिळवटून टाकणारा होता. शुभमच्या डोक्यात मोठा दगड घातल्याने त्याच्या दरम्यान रात्री उशिरा शुभमचे वडील अशोक पाटील यांनी याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली.

जुना राजवाडा आरोपीच्या शोधात आणी आरोपी एलसिबीत हजर
दरम्यान खूनाच्या घटनेनंतर संग्राम व शुभम दोघेही स्थानिक गुन्हे अन्वेषणशाखेमध्ये हजर झाले. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी असणाऱ्या जुना राजवाडा पोलिसांना आरोपींना ताब्यात घेतल्याची पुसटशी कल्पना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने दिली नाही. यामुळे जुना राजवाडा पोलिसांचे एक पथक आरोपींचा शोध घेत रात्रभर फिरत होते.

Advertisement
Tags :

.