For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोशल मीडीयावरील खुन्नस पडली महागात! रिल्समधील वादातून तरूणाचा भरदिवसा खून

07:45 PM Jun 13, 2024 IST | Abhijeet Khandekar
सोशल मीडीयावरील खुन्नस पडली महागात  रिल्समधील वादातून तरूणाचा भरदिवसा खून
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

सोशल मिडीयावऊन व्हायरल केलेल्या रिल्सवरून तरूणाच्या दोन गटात मोठा वाद उफाळून आला होता. या वादातून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने पाठलाग करून, एका तरूणावर शस्त्र हल्ला करून, त्यांचा गुरूवारी भरदिवसा खून केला. पैलवान उर्फ सुजल बाबासो कांबळे (वय 20, रा. वारे वसाहत, संभाजीनगर रोड, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे.

Advertisement

खूनाची ही घटना शहराच्या मध्यवर्ती भागातील सुधाकर जोशीनगरात घडली आहे. हल्लेखोरांकडून खूनात तलवार, एडका याचा वापर केला गेला. पैलवान उर्फ सुजल कांबळेच्या खूनाची माहिती समजताच त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी सीपीआर हॉस्पीटलमध्ये धाव घेतली. त्यामुळे हॉस्पीटलच्या आवारात मोठी गर्दी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने सीपीआरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस तपासात हल्लेखोर शहरातील लक्षतीर्थ वसाहत व दांडगाईवाडी येथील असून, त्यांची नावे ही निष्पन्न झाली आहेत. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाकडून हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली.

Advertisement
Advertisement
Tags :

.