For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कापड दलालांनी केली इचलकरंजीतील व्यापाऱ्याची ११ लाखाची फसवणूक

02:14 PM Mar 01, 2024 IST | Abhijeet Khandekar
कापड दलालांनी केली इचलकरंजीतील व्यापाऱ्याची ११ लाखाची फसवणूक
Crime
Advertisement

बोरीवली (मुंबई ) मधील दांपत्यासह तिघाविरोधी गुन्हा; शिवाजीनगर पोलीसात गुन्हा नोंद

इचलकरंजी / प्रतिनिधी

शहरातील एका कापड व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करुन, बाईदर (ठाणे) आणि बोरीवली (मुंबई ) मधील तिघानी संगनमत करीत, 11 लाख 35 हजार 811 रुपयांला गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले. फसवणूक करणाऱ्या संशयीतामध्ये एका दांपत्याचा नावाचा समावेश आहे. भरत ठक्कर ( रा. सोळकीनगर, नवघरर रोड, नियर हनुमान टेपल, बाईदर इस्ट, ठाणे), आकाश राजीव खिंवसरा, त्यांची पत्नी जयश्री राजीव खिंवसरा ( दोघे रा. साईनगर रोड, बोरीवली वेस्ट, मुंबई ) अशी त्यांची नावे आहेत. याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली असून, याबाबत वरुण अभयकुमार बरगाले (रा. राजाराम रोड, इचलकरंजी ) यांनी फिर्याद दिली आहे.

Advertisement

कापड व्यापारी वरुण बरगाले यांची ॲडोरेबल लाईफस्टाईल या नावाची फर्म आहे. त्यांची भरत ठक्कर, आकाश खिंवसरा, त्यांची पत्नी जयश्री खिंवसरा या तिघा संशयीत कापड दलालाबरोबर कापड खरेदीच्या माध्यमातून ओळख झाली. या ओळखीतून या तिघा संशयितांनी बरगाले यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून 15 लाख 84 हजार 911 रुपये किंमतीचे कापड खरेदी केले. ते कापड शॉप नंबर 18, यशंवत शॉपींग सेंटर, रेल्वे स्टेशन समोर, बोरीवली पुर्व, मुबंई येथे पाठविण्यास सांगितले. या खरेदी केलेल्या कापडाच्या रक्कमेपैकी तिघा संशयीतांनी 4 लाख 4 हजार 100 रुपये देवून, उर्वरीत कापडाची रक्कम न देता व त्यांचे पी. आर. एंटरप्रायइचा जी.एस.टी. क्रमांक 27AABPY4180G1ZH असा खोटा जी.एस.टी. क्रमांक देवून, संगणमताने कापड व्यापारी बरगालेच्या ॲडोरेबल लाईफस्टाईल या फर्मची 11 लाख 35 हजार 811 रुपयांची फसवणुक केली.

Advertisement
Advertisement
Tags :

.