महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कोडोली बाजारात सोने बदलून देण्याच्या बहाण्याने दीड तोळे सोने लांबवले

11:29 AM Feb 09, 2024 IST | Abhijeet Khandekar
Kolhapur Crime Kodoli
Advertisement

केखलेच्या महिलेची फसवणूक, महिलेसह दोन संशयीत चोर सिसीटीव्ही फुटेजमध्ये कैद

वारणानगर / प्रतिनिधी

कोडोली ता. पन्हाळा येथील आज गुरुवार दि. ८ रोजी आठवडा बाजारात सकाळी १२ वा. सुमारास आलेल्या केखले ता. पन्हाळा येथील अलका बाळासो माने वय ६२ यांच्याकडून सोने बदलाच्या बहाण्याने मंगळसूत्र व कर्णफुले, बुगडी असे सुमारे (दीड)१.५ तोळे सोन्याचे दागिने घेवून लांबवल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून सदर चोर महिला तिचे दोन साथीदार सिसीटीव्हीत कैद झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसारअलका माने या उपचारासाठी कोडोलीत आल्या होत्या त्या एसटी बसची चौकशी करून त्यांना लाल रंगाची साडी नेसलेली अनोळखी महिला भेटली तिने माझ्याकडे सोन्याच्या पुतळ्या आहेत बहिणीचे ऑपरेशन करायचे आहे त्या विकायच्या आहेत परंतु त्याला योग्य किंमत मिळत नाही असे सांगतअसताना तिथे आणखी एक आलेल्या इसमाने सदर अनोळखी महिलेकडे सोन्याच्या पुतळ्या २ लाख रुपयाला मागून देखील त्या महिलेने त्या दिल्या नाहीत याच वेळी त्या महिलेने अलका माने यांना तुमचे सोने आम्हाला द्या त्याबदल्यात हे खऱ्या सोन्याच्या पुतळ्या तुम्हाला घ्या असे सांगून कापडात बांधलेल्या बनावट सोन्याच्या पुतळ्या माने यांना दिल्यावर त्या परिवार ज्वेलर्स येथे खात्री करण्यास गेल्यावर सोनाराने त्यांना त्या बनावट असल्याचे सांगितले.

Advertisement

अलका माने आपली फसवणूक झाल्याने भांबावल्या त्यांना झाला प्रकार निटसा सांगता देखील येत नव्हता त्या आक्रोश करत होत्या एवढा त्यांना घटनेचा धक्का बसला होता घटनेचे गांभीर्य ओळखून वृत्तपत्र विक्रते,पत्रकार झाकीर जमादार यानी कोडोली पोलीसांना तसेच नातेवाईकांना घटनेची माहिती दिली घटनास्थळी पोलीस तात्काळ आले तथापी चोर महिला व तिचे साथीदार गायब होण्यात यशस्वी झाले होते. घटनास्थळाच्या मार्गावर काही दुकानात असलेल्या सिसीटिव्ही फुटेज मध्ये ही महिला स्पष्ट दिसत असून या अनुषंगाने गतीने तपास सुरू केला आहे.

Advertisement

याबाबतची फिर्याद अलका माने यानी दिली असून अनोळखी महिले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे, हावलदार सागर कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णात पाटील, सागर जाधव,ऋषिकेश पाटील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :
#kolhapur crimeexchanging goldkodoli
Next Article