महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गांधीनगर येथील दुकानातून व्यापाऱ्याची बॅग चोरणारा ताब्यात ‍! चोवीस तासात चोरट्याचा शोध

08:16 PM Nov 08, 2023 IST | Abhijeet Khandekar
Gandhinagar
Advertisement

सात हजारांचा मुद्देमाल हस्तगत,एकास अटक; गांधीनगर गुन्हे शोध पथकांची कारवाई

उचगाव / वार्ताहर

गांधीनगर ता.करवीर येथे मंगळवारी सायंकाळी बाजारपेठमधील बस स्टॉप जवळ असलेल्या शगुन लेडीज वेअर दुकानातून व्यापाऱ्याची बॅग चोरीला गेली. बॅग चोरीचा गुन्हा चोवीस तासाच्या आत गांधीनगर पोलिसांनी उघडकीस आणला असून सात हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Advertisement

याप्रकरणी रमेश बाबूराव डिकूळे, वय ३४, रा. घोटी ता. करमाळा जि. सोलापूर या संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली. याबाबत राजेश भजनलाल काडीळा वय ५२ धंदा व्यापार रा. हॉपी होम ३ रा मजला रू. नं. ३०१ उल्हासनगर ता.जि.ठाणे यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्याद दिली.

Advertisement

याबाबतची अधिक माहिती अशी, व्यापारी राजेश काडिळा हे गांधीनगर बस स्टॉप जवळील शगुन या दुकानात आले होते. त्यांच्याकडील लेझर बॅग ज्यामध्ये रोख रक्कम ५९००/- व सॅम्पल करता आणलेले साहित्यासह असा ऐकून ७०००/-रूपयांचा माल खरेदीच्या बहाण्याने आलेल्या एका चोरट्याने लंपास केली.

गांधीनगर पोलीस ठाण्याचे सपोनी अर्जुन घोडे पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राळेभात, पोलीस हेडकॉन्स्टेबल बजरंग हेब्बाळकर, रोहित चौगुले, संदीप कुंभार, सचिन सावंत, संतोष कांबळे यांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी त्वरित संस्थेचा शोध घेत घेऊन खात्रीशीर खबर मिळाल्यानंतर गणेश टॉकीज गांधीनगर येथे चोरट्या पकडले. त्याच्याकडून चोरीची बॅग व मुद्देमाल जप्त केला २४ तासाच्या आत गांधीनगर पोलिसांनी चोरीचा छडा लावल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे याबाबत अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप कुंभार करीत आहेत.

Advertisement
Tags :
#kolhapur crimebag thiefGandhinagartarun bharat news
Next Article