Kolhapur Breaking : भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांचा राजीनामा!
गारगोटी प्रतिनिधी
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा आज राजीनामा दिला असुन राजीनामा देवून ते काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा उध्दव बाळासाहेब ठाकरे यापैकी कोणत्या पक्षात ते प्रवेश करणार याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेणार आहेत. मात्र आमदार सतेज पाटील यांच्याशी त्यांच्या घराण्याचे जूने संबंध व विधानसभा उमेदवारीचा शब्द यांची जुळणा करुन भविष्यात त्यांची वाटचाल महाआघाडीच्या बाजुने रहाणार असल्याचे स्पष्ट आहे.
पाच वर्षांपूर्वी देसाई यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला मात्र सत्तेचा कोणत्याही लाभ त्यांना भेटला नसल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये असंतोष होता, त्यामुळे भाजपा सोडण्यासाठी त्यांच्या वर दबाव होता.
महायुतीची उमेदवारी विद्यमान खासदार आमदार प्रकाश आबीटकर यांना निश्चित असल्याने त्यांच्या पुढे राजकीय निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. कोल्हापूर मध्ये देसाई यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सुरू असुन राजीनामा देण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढला आहे.तर नवीन भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांची निवड निश्चित झाली आहे.