For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Breaking : कागल हादरले! आणूरमध्ये चौघांचा बुडून मृत्यु; तालुक्यावर शोककळा

06:18 PM May 17, 2024 IST | Abhijeet Khandekar
kolhapur breaking   कागल हादरले  आणूरमध्ये चौघांचा बुडून मृत्यु  तालुक्यावर शोककळा
Advertisement

बस्तवडे ता कागल येथील वेदगंगा नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या मुलाला वाचविताना चौघां जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये मामा माय लेकरांसह चौघा जणांचा समावेश आहे.

Advertisement

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, आणूर ता कागल येथे बुधवारी याञेसाठी गुरुदास लोकरे यांच्या घरी नातेवाईक आले होते. यापैकी आज शुक्रवारी दुपारी तीन वाजता वेदगंगा नदीकाठावर बस्तवडे बंधार्या नजीक जितेंद्र विलास लोकरे (वय३६ रा.मुरगुड ता.कागल), साधना जितेंद्र लोकरे (वय ३०रा.मुरगुड ता कागल), रेश्मा दिलीप येळमल्ले (वय३४ रा अथणी ता.चिक्कोडी),हर्ष दिलीप येळमल्ले (वय१७रा.अथणी ता.चिक्कोडी), सविता अमर कांबळे (वय२७रा.रुकडी ता.हातकणंगले) हे कपडे धुण्यासाठी तसेच आंघोळीसाठी नदीत उतरले होते. हर्ष हा खोल पाण्यात बुडताना आरडाओरड करत होता. यावेळी शेजारीच असणारा जितेंद्र हा त्याचा मामा पाण्यात उतरला आणि त्याच्या पाठोपाठ रेश्मा,साधना व सविताही उतरली.माञ, पाण्याचा प्रवाह आणि भीतीपोटी एकमेकांना सर्वानीच घट मिट्टी मारल्याने ते नदीत बुडाले गेले.

नदीच्या काठावर आरोही जितेंद्र लोकरे (वय १२) या चिमुकलीने या सर्वांना बुडताना पाहिले. ती जोरात आरडाओरडा करत होती. यावेळी नदीकाठावर मासे पकडण्यासाठी आलेल्या बस्तवडे येथील अवधुत वांगळे यांनी गावातीलच प्रमोद पाटील याला बोलावून प्रसंगावधानता राखत नदीत उड्या घेतल्या. त्यांनी साधना लोकरे यांना वाचविण्यात यश आले. तसेच त्यांनी हर्ष वगळता तीघाजणांचे मृतदेही त्यांनी नदीकाठावर आणले.

Advertisement

अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई, तहसीलदार अमरदिप वाकडे, मुरगुडचे सहायक पोलिस निरीक्षक करे, कागलचे पोलिस अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा केला. कागल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. माजी आमदार संजय घाटगे,आणूरचे सरपंच काकासाहेब सावडकर, पोलिस पाटील स्वाती कांबळे, बस्तवडेचे जयश्री साताप्पा कांबळे हे घटनास्थळी उपस्थित होते.दरम्यान, हर्षचा मृतदेह राञी उशिरापर्यंत शोधपथकाद्वारे शोध सुरू होता.

वेदगंगा नदीकाठावर नातेवाईकांचा आक्रोश...

घटनेचे वृत्त समजताच आणूर,बस्तवडे, सोनगे, म्हाकवे,बानगे तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तर नातेवाईकांनी मृतदेह पाहून आक्रोश केला.

आरोहीसमोरच वडीलांसह नातेवाईकांचा अंत
आरोही ही काठावर उभी होती तिच्या डोळया समोरचवडील, अत्या व अतेभाऊ यांचा अंत झाला.तिने आपला चुलता मारुती लोकरे याला फोन करून घटनेची माहिती दिली.

Advertisement

.