खंडपीठ कृती समितीची कोल्हापुरात बैठक; बार असोसिएशनमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळला : वकिलांमध्ये दोन गट
ज्येष्ठ वकिलांचा अपमान झाल्याने विरोधक बैठकीला राहाणार अनुपस्थित; विरोधकांच्या आरोपाचे खंडन करत बैठक यशस्वी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा निर्धार
कोल्हापूर प्रतिनिधी
खंडपीठ कृती समितीने सहा जिह्यातील पदाधिकाऱ्यांची आज (शनिवारी) बैठक आहे. बैठकीपूर्वीच बैठकीच्या निमंत्रण दिलेल्या नावाच्या क्रमवारीत ज्येष्ठांचा अपमान झाल्याचा कारणावरुन वकिलांमध्ये वादाची ठिणगी पडून, वकिलांमध्ये दोन गट पडले. विरोधी गटाने सत्ताधारी गटावर टीका करीत, शुक्रवारी (5 जुलै) निषेधाची पत्रके काढून, शनिवारच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याबाबत जाहीर केले. तर सत्ताधारी आघाडीने आरोपाचे खंडन करुन विरोधकांनी वैफल्य ग्रस्तातून आरोप केले असून, खंडपीठ बैठक यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रकाराने बार असोसिएशनमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आला आहे.
या बैठकीसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या सहा जिह्यातील जिल्हा बार असोसिएशन, तालुका बार असोसिएशन, लोकल बार असोसिएशनसह बार कौन्सिल सदस्यांना लेखी नोटीस देऊन हजर राहण्याबाबत बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी कळविले होते. तर काहींना प्रत्यक्ष फोनद्वारे संपर्क साधून हजर राहण्याविषयी सांगण्यात आले होते. हा सर्व प्रकार सुरु असताना महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्षांसह तीन पदाधिकाऱ्यांनी शनिवारच्या बैठकीस उपस्थित राहणार नाही. याचे एक पत्र कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षांना दिले. तेथूनच वकिलांच्या दोन गटातील वादाला सुरुवात झाली. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅङ विवेक घाटगे, जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅङ प्रकाश मोरे, माजी सचिव अॅङ सुशांत गुडाळकर, अॅङ तेजगोंडा पाटील, अॅङ सतीश कुणकेकर आदींनी निषेधाचे एक पत्रक काढले. शनिवारच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे कळविले. मात्र या सर्व प्रकाराचे खंडन करीत, खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅङ सर्जेराव खोत यांनी शनिवारच्या सभेला मोठ्या संख्येने सहा जिह्यातील वकील उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
निवडणुकीचे पडसाद या बैठकीवर
खंडपीठासाठी गेली 40 वर्षाहून अधिक काळ लढा सुरु आहे. त्यासाठी आंदोलन, मोर्चा, उपोषण, मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तीची भेट घेतली आहे. मात्र ज्येष्ठ वकिलांच्यात दोन गट पडल्याने, खंडपीठाकरीता सुऊ असलेले आंदोलन चुकीच्या दिशेने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बार असोसिएशनची काही दिवसापूर्वी जी निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये जे काही हेवेदावे, मतभेद निर्माण झाले होते. त्याचे खंडपीठासाठी शनिवारी बोलविण्यात आलेल्या बैठकीवर पडसाद उमटतांना दिसत आहे.
सभेच्या गर्दीतून विरोधकांना बसणार चपराक
खंडपीठासाठी शनिवारी सहा जिह्यातील वकिलांची बैठक बोलविण्यात आली आहे. बैठकीपूर्वीच विरोधकांनी केलेला हा प्रकार वैफल्य ग्रस्तातून केला आहे. ज्या वेळी ते कृती समितीचे निमंत्रक होते. त्यावेळी त्यांनी एकही बैठक घेतली नाही. बैठकीची नोटीसवर सर्वांच्या स्वाक्षरी आहेत. सर्वांना बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. आज होत असलेल्या बैठकीच्या गर्दीतून विरोधकांना चांगली चपराक बसणार आहे.
अॅङ सर्जेराव खोत, अध्यक्ष जिल्हा बार असोसिएशन
जेष्ठ वकिलांचा अपमान
खंडपीठ कृती समितीने शनिवारी जी बैठक बोलविण्यात आलेली आहे. ती बैठक एका विशिष्ट गटाची असल्याची दिसून येते. बैठकीच्या निमंत्रणात जाणीवपूर्वक बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षांची नावे शेवटी घातली आहेत. हा ज्येष्ठ वकिलांचा एक प्रकाराचा अपमान केल्याचे दिसत असल्याने, या कृतीचा निषेध आहे. तसेच यादीतील ज्येष्ठ वकिलांना सक्रिय सभासदांना आमंत्रण नसल्याने राजकारण सुरु असल्याचे दिसत आहे.
अॅङ विवेक घाटगे, सदस्य महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल