महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

...अन्यथा गनिमी काव्याने सीमाभागात प्रवेश करणार

10:37 AM Oct 29, 2022 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

-शिवसेनेतर्फे सोमवारी कोल्हापूर-बेळगाव ‘मशाल रॅली’,
-बेळगाव येथील ‘1 नोव्हेंबर काळा दिन’ समर्थनार्थ आयोजन
- जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांची माहिती

प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur News: बेळगाव येथे 1 नोव्हेंबरला होणाऱ्या काळा दिनाच्या समर्थनार्थ शिवसेनेतर्फे (उध्दव ठाकरे गट) सोमवारी (दि. 31) कोल्हापूर-बेळगाव ‘दिवस वेदनांचा-दौड मशालीची’ या मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. राजर्षी समाधीस्थळ येथून सकाळी 10 वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या रॅलीला सीमाभागात प्रवेश न दिल्यास गनिमी काव्याने प्रवेश केला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Advertisement

देवणे व पवार म्हणाले, केंद्र सरकारने 17 जानेवारी 1956 ला प्रांतरचना जाहीर केली. यानंतर झालेल्या गोळीबारात 106 जण हुतात्मे झाले. 1 नोव्हेंबर 1956 ला केंद्र सरकारने मुंबई प्रांतात असणारे बेळगाव, धारवाड, विजापूर, कारवार हे चार जिल्हे व हैदराबाद प्रांतात असणारे बिदर व गुलबर्गा हे जिल्हे म्हैसूर प्रांतात समाविष्ट केले. त्यामुळे त्या दिवसापासून 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळला जातो. यावेळी 1 नोव्हेंबरला बेळगाव येथे ‘काळा दिन’ पाळला जाणार असून या दिवशी रॅली निघणार आहे.

Advertisement

या रॅलीच्या समर्थनार्थ तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला बळ मिळावे, यासाठी शिवसेने (उध्दव ठाकरे) तर्फे सोमवारी (दि. 31) सकाळी 10 वाजता कोल्हापूरातील राजर्षी शाहू समाधीस्थळापासून ‘दिवस वेदनांचा-दौड मशालीची’ या मशाल रॅलीचे आयोजन केले आहे. रॅलीच्या सुरुवातीला रथामध्ये मशाल व भगवा ध्वज असणार आहे. त्या पाठोपाठ चारचाकी वाहनातून शेकडो सैनिक रवाना होणार आहेत. कागल, निपाणी, संकेश्वर, हत्तरगी या ठिकाणी या मशालीचे मराठी बांधवांतर्फे स्वागत होऊन पूजनही केले जाणार आहे. या मशालीच्या पुजनासाठी महाराष्ट्र एकिकरण समितीचे नेते व शिवसेनेचे बेळगाव-निपाणीचे नेते दीपक दळवी, मालोजीराव अष्टेकर, मनोहर किणेकर, शिवाजी सुंठकर, शुभम शेळके, प्रकाश शिरोळकर, प्रकाश मरगाळे, सचिन गोरले, दिलीप बैलूरकर, किरण गावडे आदींना निमंत्रित केले जाणार आहे. या रॅलीमध्ये सीमाभागातील मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#Belguam#kolhapur#udhhavthackerayshivsena
Next Article