For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बोलेरो- पिकअप व मोटर सायकल धडक...मोटरसायकलस्वार जागीच ठार

06:59 PM Aug 31, 2024 IST | Abhijeet Khandekar
बोलेरो  पिकअप व मोटर सायकल धडक   मोटरसायकलस्वार जागीच ठार
Advertisement

मयत केर्ली गावातील; कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील हॉटेल ग्रीन फिल्ड जवळील घटना ...

Advertisement

प्रयाग चिखली वार्ताहर
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील रजपुतवाडी नजीक हॉटेल ग्रीन फिल्ड जवळ बलेरो पिकअप आणि मोटरसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये मोटरसायकलस्वार कपिल आकाराम माने( वय 30) रा.केर्ली (जोतिबा रोड)हा जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी दुपारी एक वाजता घडली.

अधिक माहिती अशी, दुपारी एक वाजता मयत कपिल हा कोल्हापूरहून केर्ली गावाकडे मोटरसायकल वरून जात होता. हॉटेल ग्रीन फिल्ड समोर अचानक त्याच्या मोटरसायकलची धडक रत्नागिरी कडून कोल्हापूर कडे येणाऱ्या बोलेरोशी झाली. यावेळी तो फरकटत जाऊन रस्त्यावर पडला. यावेळी कपिल याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन घटनास्थळी त्याचा मेंदू रस्त्यावर पडला. त्यामुळे तो जागीच ठार झाला.

Advertisement

मयत कपिल याचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. तो फाइव स्टार एमआयडीसी मध्ये कारखान्यात कामास होता. त्याचे वडील मेंढपाळ आहेत त्याने आज कामावरून सुट्टी घेतली होती काही कामानिमित्त गेलेला कपिल कोल्हापूर वरून केर्ली गावाकडे जात असताना त्याचा अपघात झाला. घटनेपासून जवळच केर्ली गाव असल्यामुळे त्याचा भाऊ कुमार माने तसेच केर्ली गावातील अनेक तरुण व नागरिक घटनास्थळी जमा झाले होते.

घटनास्थळी करवीर पोलिसांनी पंचनामा केला असून बोलेरो पिकप चा चालक मिलिंद शांताराम सावंत राहणार हरपवडे देवरुख तालुका संगमेश्वर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील तपास उपनिरीक्षक निवास पवार हे करत आहेत

Advertisement
Tags :

.