For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News : औराद येथे जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळाकडून कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी

03:51 PM Oct 07, 2025 IST | NEETA POTDAR
solapur news   औराद येथे जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळाकडून कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी
Advertisement

                                         भाकरी व गरगट्टा महाप्रसादाचे वाघचवरे परिवाराकडून वाटप

Advertisement

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळाकडून कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी देण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती .

प्रारंभी जय हनुमान नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने श्री आदिशक्ती देवीची पूजा सोलापुरातील प्रसिद्ध डॉ. सत्यवान वाघचवरे, सौ.शीला वाघचवरे, डॉ. सत्यजित वाघचवरे , डॉ .शुभांगी वाघचवरे, डॉ. अभिजीत वाघचवरे व डॉ. राजश्री वाघचवरे यांच्या हस्ते करण्यात आली.

Advertisement

यानंतर कुंभ लिलाव करून देवीच्या वस्त्रांचे लिलाव करण्यात आले. यावेळी भक्तांनी उस्फूर्तपणे सहभाग घेत या लिलावात भाग घेतला. सीना पूरग्रस्तांना मदतीचा देण्यासाठी पुढाकार केला. कारण मदत सर्वत्र मिळाला असल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना महाप्रसादाचे वाटप करायचे सुचवले. त्याप्रमाणे त्यांनी अन्नदान सर्वश्रेष्ठ दान यावरती प्रमाणे महाप्रसाद आयोजन केले.

यानंतर वाघचवरे दाम्पत्याकडून कडक भाकरी व गरगट्टा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी मनमुराद आस्वाद उठला. याप्रसंगी डॉक्टर बंधूंनी आपल्या हातून सामाजिक कार्य घडत असल्याचे सांगून पूरग्रस्तांसोबत आनंद साजरा करता आला. असे यावेळी बोलताना सांगितले. प्रारंभी महापूजेसाठी केशव कवीश्वर भडजी यांच्याकडून आरती करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावित माजी उपसरपंच अरविंद शेतसंदी यांनी केले.

या कोजागिरी कार्यक्रमाप्रसंगी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप टेळे, सरपंच शशिकांत बिराजदार, ग्रामसेवक निलप्पा येळमेली, माजी सरपंच शांतकुमार गडदे, श्री मल्लिकार्जुन देवस्थान समितीचे अध्यक्ष लिंगराज पाटील , श्याम तेली, माजी सरपंच यल्लाप्पा कोळी, माजी उपसरपंच अरविंद शेतसंदी, पोलीस पाटील सैपन बेगडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महासिद्ध हंडे,

इरण्णा पोतदार ,शिवा लामतुरे, गणेश महिंद्रकर, विकास माने,,माजी उपसरपंच इराणा बनसोडे, उपसरपंच विठ्ठल नरोटे, माजी सरपंच सिद्धारूढ घेरडी, उद्योगपती राहुल महिंद्रकर, नितीन तेली, श्रीशैल तेली, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा टेळे, अप्पाराव येडगे, डॉ.  शिवपुत्र यलगोंडे, महासिद्ध शेंडगे, युवा नेते संजय वाघमारे, मल्लिकार्जुन रणखांबे, श्रीकांत कोळी, ऋषिकेश घेरडी, कोतवाल अप्पू कोळी, यांच्यासह ग्राम सुरक्षा दलाचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.