kolhapur Crime : कोडोलीत मैत्रीचा फायदा घेत 3.5 लाखांची फसवणूक
कोडोली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा
कोल्हापूर : घरावर बँकेची जप्ती आल्याचे निमित्त करून कोडोली ता. पन्हाळा येथील मैत्रीच्या ओळखीचा फायदा घेऊन साडेतीन लाख रुपये उसने पैसे घेतले. पैसे परत न केल्याने बोरवडे ता. कागल येथील दोन महिलेसह चौघा विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चंद्रकांत यादव महापुरे रा. कोडोली) याने कोडोली पोलीस ठाण्यात दिली.
फिर्यादीवरून सुनिल नरहरी बलुगडे, प्राजक्ता सुनिल बलुगडे, वैभव मुनिल बलुगडे, पुजा मुनिल बलुगडे (सर्व रा. बोरवडे ता. कागल) यांचेवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बलुगडे कुटुंबीय व चंद्रकांत महापुरे यांच्यात मैत्रीचे संबंध होते. २२ फेब्रुवारी २४ रोजी बलुगडे कुटुंबीय चंद्रकांत यांच्या घरी येऊन आम्ही बँकेचे कर्ज काढले असून कर्जाचे हप्ते न भरल्याने बँकेची घराबर जप्ती आलेली आहे असे खोटे सांगुन यासाठी महापुरे यांच्याकडून आर्टिजीसद्वारे साडेतीन लाख रुपये घेतले व त्या बदल्यात दोन चेक दिले होते.
या नंतर वेळोवेळी बँकेत चेक टाकू नका असे सांगुन तारखा दिल्या व घेतलेली रक्कम आज तागायत परत न दिल्याचे महापुरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने चौघा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग करत आहेत.