कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकेत सुपरस्टोअरमध्ये चाकूहल्ला, 11 जण जखमी

06:22 AM Jul 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोलिसांकडून संशयिताला अटक

Advertisement

वृत्तसंस्था/ ट्रॅवर्स

Advertisement

अमेरिकेच्या उत्तर मिशिगन येथील ट्रॅवर्स शहरात वॉलमार्ट सुपरस्टोअरमध्ये चाकूने हल्ला झाला आहे. या हल्ल्यात कमीतकमी 11 जण जखमी झाले असून यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सुपरस्टोअरमध्ये चाकूने हल्ला करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

तर घटनेनंतर ट्रॅवर्स सिटी वॉलमार्ट स्टोअरबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून अग्निशमन दलाचे पथकही तैनात करण्यात आले. संशयित ताब्यात असून सद्यक्षणी त्याच्याबद्दलची माहिती उघड करता येणार नाही. लोकांनी तपास सुरू असेपर्यंत संबंधित क्षेत्रापासून दूर रहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तर हल्लेखोरोने फोल्डिंग स्टाइलचा चाकू वापरल्याचे समते. संशयित आरोपी मिशिगनचा रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. कंपनी तपास यंत्रणांसोबत पूर्ण सहकार्य करत आहे. अशाप्रकारची हिंसा अस्वीकारार्ह असून आमच्या संवेदना जखमींसोबत आहेत असे वॉलमार्टचे प्रवक्ते पेनिंग्टन यांनी म्हटले आहे. या क्रूर हिंसेने त्रस्त समुदायासोबत संवेदना असल्याचे वक्तव्य मिशिगनचे गव्हर्नर ग्रेचेन व्हिटमर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article