कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव महापालिकेतही केएमएफ रजिस्टर सुरू करणार

12:21 PM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मनपा आयुक्तांची माहिती : मिळकतधारकांना होणार लाभ

Advertisement

बेळगाव : चालू आर्थिक वर्षापासून घरपट्टीत 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने याची महापालिकेकडून अंमलबजावणी केली जात आहे. 3 टक्के वाढीचे चलन दिले जात असले तरी मिळकतधारकांना देण्यात येणाऱ्या चलनात मोठी तफावत होत आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर असून महापालिकेच्या सॉफ्टवेअरमध्ये समस्या असल्यानेच वाढीव चलन दिले जात आहे, असा आरोप नगरसेवक शंकर पाटील यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत केला. त्यावेळी बेळगाव महापालिकेसाठी केएमएफ रजिस्टर सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या खुल्या जागांचा वापर त्याचबरोबर व्यापार परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर यापूर्वी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत 4 टक्के घरपट्टी वाढीचा निर्णय घेण्यात येणार होता. मात्र, बहुतांश नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध केल्याने 3 टक्के घरपट्टी वाढविली. त्यानुसार आता महापालिकेकडून मिळकतधारकांना वाढीव घरपट्टीनुसार चलन दिले जात आहे. मात्र, दिल्या जाणाऱ्या चलनात मोठी तफावत दिसून येत आहे. ही बाब बहुतांश जणांच्या निदर्शनास येत नसल्याने त्यांच्याकडून महापालिकेला घरपट्टी स्वरुपात मोठी रक्कम भरली जात आहे.

घरपट्टीपेक्षा जादा रक्कम भरलेल्यांना त्यांचे पैसे परत करण्यासह पुढील वर्षी त्यामध्ये सवलत देण्यात येणार का? असा प्रश्न बैठकीत विचारण्यात आला. त्यावेळी तसे करता येते, मात्र महापालिकेकडे सध्या केएमएफ रजिस्टर नाही. सदर रजिस्टरमध्ये ज्या मिळकतधारकांनी घरपट्टीपेक्षा अधिक रक्कम भरली आहे, त्यांची नोंद केली जाते. त्यामुळे सदर रजिस्टर बेळगाव महापालिकेत देखील सुरू क्हावे, यासाठी सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील अनेक जुन्या घरांची घरपट्टी भरण्याकडे बहुतांश जणांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सदर रक्कम मोठी असून मिळकतधारकांना वन टाईम सेटलमेंट (ओटीएस) करून दिल्यास जुनी घरपट्टी देखील मोठ्या प्रमाणात वसूल होण्यास मदत होईल. त्यामुळे याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article