महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केएलएस, झेवियर्स, केएलई, केंद्रीय विद्यालय 2 उपांत्य फेरीत

10:26 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : आरडीज फुटबॉल संघटना आयोजित शिरगुरकर चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी सेंट झेवियर्स अ, केंद्रिय विद्यालय 2, केएलई इंटरनॅशनल व केएलएस संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन उपांत्य फेरीपत प्रवेश केला आहे. टिळकवाडी येथे सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपमहापौर आनंद चव्हाण, स्पर्धेचे पुरस्कर्ते नितीन शिरगुरकर, स्पर्धा सचिव राहुल देशपांडे, आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते मैदानाची पूजा करुन व चेंडू लाथाडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विजय रेडेकर, कौशिक पाटील, लॉरेन्स परेरा आदी उपस्थित होते.पहिल्या सामन्यात केएलई इंटरनॅशनलने सेंट झेवियर्सचा 1-0 असा पराभव केला. सामन्याच्या 18 व्या मिनीटाला केएलईच्या अब्दुलाने गोल करुन 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात सेंट झेवियर्स ब संघाने गुडस् शेफर्ड संघाचा 2-0 असा पराभव केला.

Advertisement

सेंट झेवियर्सतर्फे अर्जुन एस.ने पहिला गोल कर तर इशांतने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सामन्यात सेंट मेरीजने ज्योती सेंट्रलचा 3-0 असा पराभव केला. मेरीजतर्फे उमर सय्यदने 2 तर राहिल मकानदारने 1 गोल केला. चौथ्या सामन्यात भरतेशने एमव्हीएमचा 1-0 असा पराभव केला. भरतेशतर्फे आर्यनने एकमेव गोल केला. केंद्रीय विद्यालय 2 ने एम.व्ही. हेरवाडकरचा 2-0 असा पराभव केला. केंद्रिय विद्यालयातर्फे अथर्व व रोहीतने प्रत्येकी 1 गोल केला. सहाव्या सामन्यात केएलई इंटरनॅशनलने सेंट मेरीजचा टायब्रेकरमध्ये 8-7 अशा गोलफरकाने पराभव केला. निर्धारित वेळेत दोन्ही संघाचे गोल फलक 2-2 असे बरोबरीत राहिले. सेंट मेरीजतर्फे आर्यन किणेकर, गुरूनाथ यांनी प्रत्येकी एक गोल केला तर केएलईतर्फे अब्दुलाने दोन केले. सातव्या सामन्यात सेंट झेवियर्स ब संघाने भरतेश संघाचा 2-0 असा पराभव केला. सेंट झेवियर्सतर्फे माहीत व सोफीयान यांनी प्रत्येकी एक गोल केले. शुक्रवारी सकाळी पहिल्या उपांत्य फेरीचा सामना केंद्रिय विद्यालय 2 व केएलई इंटरनॅशनल यांच्यात सकाळी 9 वाजता खेळविला जाणार आहे. तर दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना केएलएस वि. सेंट झेवियर्स ब यांच्यात सकाळी 10 वाजता खेळविला जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article