महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केएलएस-सेंट झेवियर्स आज अंतिम लढत

09:03 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फिनिक्स चषक क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : फिनिक्स स्कूल आयोजित फिनिक्स चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यातसेंट झेवियर्सने केव्ही-2 चा तर केएलएसने ज्ञानप्रबोधनचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्वयम व•sबैलकर (झेवियर्स), सुरेंद्र   पाटील (केएलएस) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. फिनिक्स मैदानावर आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केव्ही-2 ने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्व गडी बाद  108 धावा केल्या. त्यात आर्यनने 6 चौकारांसह 41 धावा केल्या. झेवियर्सतर्फे स्वयम, आयुष, परिक्षीत व लाभ यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सेंट झेवियर्सने 14.4 षटकात बिनबाद 107 धावा करुन सामना 10 गड्यांनी जिंकला. त्यात स्वयम व•sबैलकरने 1 षटकार व 11 चौकारांसह नाबाद 70 तर लाभ वेर्णेकरने 4 चौकारांसह नाबाद 26 धावा केल्या. या जोडीने पहिल्या गड्यासाठी नाबाद 107 धावांची भागिदारी केली.

Advertisement

दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात ज्ञान प्रबोधन मंदिरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी बाद 131 धावा केल्या. त्यात आयुष व आदेशने 1 षटकार, 3 चौकारांसह 31 धावा केल्या. केएलएसतर्फे सुरेंद्र पाटीलने 15 धावात 5 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलसने 20 षटकात 7 गडी बाद 132 धावा करुन सामना 3 गड्यांनी जिंकला. शेवटच्या षटकात 10 धावांची गरज असताना नमित बाळेकाइने षटकार खेचून सामना जिंकून देण्यास सिंहाचा वाटा उचलला. त्यात अथर्व दिवटेने 4 चौकारांसह 31 धावा, सोहम पाटीलने 3 चौकारांसह 29, सुरेंद्र पाटीलने 2 चौकारांसह 17 तर नमिद बाळेकाइने नाबाद 1 षटकाराच्या सहाय्याने 10 धावा केल्या. ज्ञान प्रबोधनतर्फे गंगाधरने 2 गडी बाद केले. अंतिम सामना मंगळवारी केएलएस विरुद्ध सेंट झेवियर्स यांच्यात खेळविण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article