महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केएलएस, संतमीरा, चिटणीस,हेरवाडकर उपांत्य फेरीत

09:11 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व तात्यासाहेब मुसळे माध्यमिक स्कूल आयोजित टिळकवाडी विभागीय फुटबॉल स्पर्धेत केएलएस, संतमीरा, एम. व्ही. हेरवाडकर व जी. जी. चिटणीस संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्लेजेंट कॉन्व्हेंट स्कूलचे अध्यक्ष यशोधर जैन, टिळकवाडी विभागीय शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील, संतोष दळवी, सी. आर. पाटील, सोमशेखर हुद्दार, प्रवीण, अर्जुन भेकणे आदी मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख करुन करण्यात आले. सकाळी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एसकेई मराठीने प्रेसिएस ब्लॉसम संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात एसकेई मराठीतर्फे श्रीधर संभाजीने गोल केला. दुसऱ्या सामन्यात मुक्तांगणने ओरिएंटलचा टायब्रेकरमध्ये 3-0 असा पराभव केला.

Advertisement

तिसऱ्या सामन्यात गोमटेश हायस्कूलने रजपूत बंधूचा 1-0 असा निसटता पराभव केला. गोमटेशतर्फे मृणालने 1 गोल केला. चौथ्या सामन्यात प्लेजंट कॉन्व्हेंटने बनशंकरी संघाचा सडन डेथमध्ये 4-3 असा पराभव केला. पाचव्या सामन्यात हेरवाडकरने एसकेई मराठी संघाचा 3-0 असा पराभव केला. हेरवाडकरतर्फे अथर्व सोमनाचेने 2, तर अथर्व ढेगसकरने 1 गोल केला. सहाव्या सामन्यात केएलएसने प्लेजेंट कॉन्व्हेंटचा 3-0 असा पराभव केला. केएलएसतर्फे नील बसरीकट्टीने 2 तर सुरेंद्र पाटीलने 1 गोल केला. सातव्या सामन्यात जी.जी.चिटणीसने मुक्तांगणचा सडनडेथमध्ये 4-3 असा पराभव केला. आठव्या सामन्यात संतमीरा संघाने गोमटेशचा 3-1 असा पराभव केला. संतमीरातर्फे साईराज, अब्दुल व नवाज यांनी प्रत्येकी 1 गोल केला. शनिवारी पहिला उपांत्यफेरीचा सामना संतमीरा विरुद्ध हेरवाडकर यांच्यात स. 9 वा. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना केएलएस विरुद्ध चिटणीस यांच्यात खेळविण्यात येईल.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article