केएलएस, संत मीरा, गोमटेश, चिटणीस उपांत्य फेरीत
बेळगाव : गोमटेश विद्यापीठ स्कूल मजगाव आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत केएलएस, संत मीरा, गोमटेश, जी जी चिटणीसने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. टिळकवाडी येथील लेले मैदानावर 17 वर्षाखालील मुलांच्या गटातील स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर आनंद चव्हाण गोमटेश स्कूल मजगावचे मुख्याध्यापक महांतेश हिरेमठ, प्रदीप पाटील, बापू देसाई, दयानंद बजंत्री, प्रविण पाटील, उमेश मजुकर, रामलिंग परीट आदी उपस्थित होते. पहिल्या सामन्यात जी. जा.r चिटणीसने ओरिएंटलचा 1-0 असा पराभव केला, दुसऱ्या सामन्यात संत मीराने मुक्तांगण शाळेचा 2-0 असा पराभव केला,
तिसऱ्या सामन्यात गोमटेशने एम आर भंडारी स्कूलचा 2-0 असा पराभव केला, चौथ्या सामन्यात व्ही एम शानभाग स्कूने प्रेशियस ब्लॉसमचा 2-0 असा पराभव केला. पाचव्या सामन्यात प्लेझेंट कॉन्व्हेटेने भारती विद्याभवनचा 1-0 असा पराभव केला, सहाव्या सामन्यात गोमटेशने हेरवाडकर स्कूलचा पेनल्टी शूटआऊटवर 8-7 असा पराभव केला. सातव्या सामन्यात संत मीराने शानभाग स्कूलचा 1-0 असा पराभव केला, आठव्या सामन्यात केएलएसने प्लेझेंट कॉन्व्हेंटेचा 3-0 असा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. बुधवार दि. 12 रोजी सकाळी पहिला उपांत्य सामना जी जी चिटणीस वि. गोमटेश स्कूल स. 9 वा., दुसरा उपांत्य सामना संत मीरा वि. केएलएस स. 10 वा. त्यानंतर मुलींच्या फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.