For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केएलएस, केव्ही, हेरवाडकर, झेवियर्स, डीपीएम, चिटणीस संघ विजयी

10:03 AM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
केएलएस  केव्ही  हेरवाडकर  झेवियर्स  डीपीएम  चिटणीस संघ विजयी
Advertisement

दिलीप कोल्हापुरे चषक फुटबॉल स्पर्धा

Advertisement

बेळगाव : छत्रपती शिवाजी युवक मंडळ शिवाजी कॉलनी आयोजित दिलीप कोल्हापुरे चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत उद्घाटन दिवशी केएलएस, केंद्रीय विद्यालय, हेरवाडकर, झेवियर्स, डीपीएम, जी.जी. चिटणीस संघानी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप दामलेच्या मुख्याध्यापिका सविता देसाई, जीजी चिटणीसच्या मुख्याध्यापिका डॉ. नवीन शेट्टीगार, डीपी स्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर रोजम्मा जोसेफ, आनंद चव्हाण, नंदू मिरजकर, जाकी मस्करनस, वाय. पी. नाईक, प्रणय शेट्टी, श्रीकांत फगरे आदी मान्यवरांमार्फत चेंडूला किक मारून व हवेत रंगीबेरंगी फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राकेश कांबळे, पवन कांबळे, संतोष दळवी, भोसले आदी सभासद उपस्थित होते

उद्घाटनाच्या सामन्यात केएलएसने ज्ञानमंदिर संघाचा 7-0 असा पराभव केला. केएलएसतर्फे  श्रेयश पेडणेकरने 3, चैतन्य रामगुरवाडीने 2, प्रणव लाडणेने 2 गोल केले. दुसऱ्या सामन्यात केंद्रीय विद्यालयने गोमटेशचा 2-1  असा पराभव केला. केंद्रीय विद्यालयतर्फे हर्षलने 2 तर गोमटेशतर्फे विनायकने एक गोल गेला. तिसऱ्या सामन्यात हेरवाडकरने कनक मेमोरलचा 5-0 असा पराभव केला. हेरवाडकरच्या शशांक व अनिरुद्ध यांनी प्रत्येकी दोन तर ऋषभने एक गोल केला. चौथ्या सामन्यात सेंट झेवियर्सने ओरिएंटलचा 5-0 असा पराभव केला. सेंट झेवियर्सच्या गौरांग, गौरव, रुजाई, आदम, तेजराज यांनी प्रत्येकी एक गोल केला. पाचव्या सामन्यात ज्ञान प्रबोधन मंदिरने मुक्तांगण स्कूलचा 5-0 असा पराभव केला. ज्ञान प्रबोधिनीतर्फे जेसन, सिद्धांत, गंगाधर, पृथ्वीराज व निश्चित यांनी प्रत्येकी एक गोल केले. सहाव्या सामन्यात जीजी चिटणीसने एमव्हीएमचा 1-0 असा पराभव केला. चिटणीसर्फे आदित्य देसुरकरने एकमेव गोल केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.