केएलएसचा अनुज हाणगोजीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
10:25 AM Nov 22, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते कर्नाटक सरकार व जिल्हा पंचायत हासन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या कर्नाटक राज्यस्तरीय अॅथलेटिक स्पर्धेत अनुज हाणगोजीने रौप्यपदक पटकाविल्याने त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे. हासन येथे घेण्यात आलेल्या 14 वर्षाखालील 600 मी. धावण्याच्या शर्यतीत केएलएस इंग्रजी माध्यम शाळेच्या अनुजने उत्तम कामगिरी करत रौप्य पदक पटकाविले. त्यामुळे त्याची निवड आता मध्यप्रदेशमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अॅथलेटिक स्पर्धेसाठी झाली आहे. त्याला जेष्ठ प्रशिक्षक एल. जी. कोलेकर, प्रशिक्षक अनिल गोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article