For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केएलई इंटरनॅशनल, ठळकवाडी संघ उपांत्य फेरीत

10:04 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
केएलई इंटरनॅशनल  ठळकवाडी संघ उपांत्य फेरीत
Advertisement

बेळगाव : एसकेई सोसायटी आयोजित हनुमान चषक 15 वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून केएलई इंटरनॅशनलने एम व्ही हेरवाडकरचा तर ठळकवाडी संघाने लिटल स्कॉलरचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. युग शहा केएलई, प्रज्योत उगाडे ठळकवाडी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भाग्यनगर येथील प्लॅटिनम जुबली मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एम व्ही हेरवाडकरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडीबाद 117 धावा केल्या. त्यात हर्ष नाशीपुडीने 7 चौकारांसह 57, सुजल इटगीने 25 तर लक्ष खातायतने 13 धावा केला. केएलई तर्फे युग शहाने 12 धावात 4, श्रेयसने 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलई इंटरनॅशनलने 19 षटकात 9 गडी बाद 118 धावा करून सामना एक गड्याने जिंकला. त्यात बरहाने 6 चौकारांसह 20, तर प्रीतमने 12 धावा केल्या. हेरवाडकर तर्फे मंथन व विराज माळवी यांनी प्रत्येकी 3  गडीबाद दुसऱ्या सामन्यात लिटल स्कॉलर ने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडीबाद 88 धावा केल्या. त्यात प्रीतमने 4 चौकारांसह 37, अमोघने 16 धावा केल्या. ठळकवाडी तर्फे मयूर जाधव ने तीन तर प्रज्योत व श्रीहरी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ठळकवाडी संघाने 15 षटकात 3 गडी बाद 90 धावा करून सामना 7 गाड्यांनी जिंकला. त्यात प्रज्योत उगाड्याने दोन चौकाराचे 34. विराज ने तेरा त नागेश्वर ने10 धावा केल्या. लिटल स्कॉलर तर्फे प्रीतमने 2 गडीबाद केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.