केएलई डेंटल सायन्सेसची वैज्ञानिक परिषद उत्साहात
बेळगाव : केएलई व्ही.के. इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेसतर्फे 28 वी वैज्ञानिक परिषद शानदारपणे पार पडली. संशोधन संस्थेची वैज्ञानिक क्षेत्रातील संशोधन प्रगती आणि नितीला धरून केलेला व्यवहार याचे प्रदर्शन या परिषदेत घडले. परिषदेचे उद्घाटन शिक्षणतज्ञ व दंततज्ञ डॉ. उशे मोहनदास यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी वैद्यकीय पेशामध्ये तसेच दंतवैद्यकीय पेशामध्ये निष्ठेने आणि नितीमूल्यांना धरून काम करणे महत्त्वाचे असल्याचे पटवून दिले. याप्रसंगी चेन्नईच्या डॉ. क्रितिका दत्ता यांचे बीजभाषण झाले. त्यांनी ‘मिलीमिलॅस्टिक डेंटिस्ट्री आजच्या आधुनिक जगामध्ये किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट केले. डॉ. सुरेश शेणवी यांनी व्ही.के. डेंटल संस्थेची बांधिलकी याबद्दल कार्यशाळा घेतली. या परिषदेने संशोधकांना आपला अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन करण्याची तर नवोदित विद्यार्थ्यांना विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. परिषदेच्या आयोजन समिती अध्यक्ष डॉ. सोनल जोशी व सचिव डॉ. सुरेश शेणवी यांच्या प्रयत्नांतून ही परिषद यशस्वी झाली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अलका काळे व डीन विनायक कुंभोजकर उपस्थित होते.