For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केएलई कॅन्सर हॉस्पिटलचे 30 रोजी उद्घाटन

06:12 AM Dec 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
केएलई कॅन्सर हॉस्पिटलचे 30 रोजी उद्घाटन
Advertisement

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती : अत्याधुनिक उपचार मिळणार असल्याची डॉ. कोरेंची माहिती

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बेळगावसह परिसरातील नागरिकांना कर्करोगाच्या उपचारासाठी मोठ्या महानगरांकडे धाव घ्यावी लागत होती. परंतु आता कर्करोगाचे सर्व उपचार बेळगावमध्ये करता येणार आहेत. केएलईच्या सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन सोमवार दि. 30 रोजी दुपारी 4 वा. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. या हॉस्पिटलमध्ये कर्करोगाशी संबंधित सर्व अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असतील, अशी माहिती केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

1 लाख 75 हजार चौरस फूट जागेमध्ये 300 बेडच्या कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी केली आहे. एकूण 300 कोटी रु. खर्च करून जागतिक दर्जाची यंत्रसामग्री हॉस्पिटलमध्ये आणली आहे. देशभरातील नामांकित कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम केलेले तज्ञ  सेवा बजावणार आहेत. हा कार्यक्रम जिल्हा क्रीडांगणावर आयोजित केला आहे. यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार राजू सेठ आदी उपस्थित राहणार आहेत.

या हॉस्पिटलला केएलई डॉ. संपतकुमार शिवणगी कॅन्सर हॉस्पिटल असे नाव दिले जाणार आहे. मूळचे अथणी येथील डॉ. संपतकुमार हे केएलईचे माजी विद्यार्थी असून अमेरिकेत नामवंत डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी हॉस्पिटलला 8 कोटींची देणगी दिली आहे. या हॉस्पिटलमध्ये केंद्र, कर्नाटक सरकार, महाराष्ट्र सरकार व गोवा सरकारच्या आरोग्य योजना कार्यरत केल्याचे डॉ. साधुण्णावर यांनी सांगितले. यावेळी डॉ. महांतशेट्टी आदी उपस्थित होते.

बेळगावमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण

बेळगाव जिल्ह्यात कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. केवळ केएलई हॉस्पिटलमध्ये दररोज 15 ते 20 रुग्णांना कॅन्सरचे निदान केले जात आहे. यामध्ये सर्रास तोंडाच्या कर्करोगाचा समावेश आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर पोटातील यकृत, तसेच इतर अवयवांना होणारे कॅन्सर, महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याची माहिती डॉ. एम. व्ही. जाली यांनी दिली.

Advertisement
Tags :

.