कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केएलई आयुष्मती आयुर्वेद स्पा सेंटरचे उद्या उद्घाटन

06:30 AM Dec 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डॉ. प्रभाकर कोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

शहापूर येथील केएलई बीएमके आयुर्वेद महाविद्यालय येथे अत्याधुनिक सुविधायुक्त केएलई आयुष्मती आयुर्वेद स्पा सेंटरचे उद्घाटन होणार आहे. सोमवार दि. 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता या स्पा सेंटरचे उद्घाटन होणार आहे. या समारंभाला वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील तसेच राज्याच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश, डॉ. देविका देशमुख यासह इतर उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी केएलईचे अध्यक्ष महांतेश कौजलगी असणार असल्याची माहिती केएलई चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयुर्वेदिक सेवा आता बेळगावमध्ये उपलब्ध होणार आहेत. आयुर्वेदातील अनेक उपचार पद्धती या स्पा सेंटरमध्ये उपलब्ध असणार आहेत. फाइव्ह स्टार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 9 हजार चौरस मीटर क्षेत्रामध्ये आयुष्मती ही बिल्डिंग बांधण्यात आली आहे. चार कोटी रुपये खर्च करून उत्तम आयुर्वेदिक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

अभंग, शिरोधरा, पंचकर्म यासह विविध आयुर्वेदिक पद्धतींचा या ठिकाणी उपयोग केला जाणार आहे. त्वचा, केस यासह इतर अवयवांसाठी विशेष उपचार केले जाणार आहेत. हर्बल ऑईल मसाज, हर्बल पावडर मसाज, सौंदर्य चिकित्सा यासह इतर सुविधा दिल्या जाणार आहेत. उत्तर कर्नाटकात अशा प्रकारचे पहिलेच स्पा सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना कोणतेही आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी परगावी जावे लागणार नाही, असे कोरे यांनी सांगितले.  प्राचार्य सुहास शेट्टी यांनी उपस्थितांचे स्वागत करून केएलई आयुर्वेद हॉस्पिटलविषयी माहिती दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article