कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केएल राहुलचा लॉर्ड्सवर जलवा

06:59 AM Jul 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 भारत वि इंग्लंड तिसरी कसोटी : इंग्लंडविरुद्ध चौथे शतक : टीम इंडिया 387 धावांत  ऑलआऊट

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

केएल राहुलचे शतक आणि ऋषभ पंत व रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकांनी भारताला फ्रंटसीटवर बसवले होते. पण, लंच ब्रेकपूर्वी व नंतर ऋषभ अन् लोकेश माघारी परतले अन् पडझड सुरू झाली. रवींद्रने 72 धावांची खेळी करून भारताला आघाडीच्या दिशेने नेले होते. पण, 376 धावांवर त्याची विकेट पडली अन् त्यानंतर 387 धावांवर भारतीय संघ ऑलआऊट झाला. त्यामुळे इंग्लंडच्या पहिल्या डावातील 387 धावांची बरोबरी ते करू शकले. यामुळे पहिल्या डावात कोणालाही आघाडी मिळालेली नाही. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात दिवसअखेर बिनबाद 2 धावा केल्या. झॅक क्रॉली 2 आणि बेन डकेट शून्यावर नाबाद आहेत. पण तिसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस केवळ क्रिकेटपुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यात हाय व्होल्टेज ड्रामाची भर पडली.

इंग्लंडचा पहिला डाव 387 धावांवर आटोपल्यानंतर, भारतीय संघाकडून केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. भारताला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. यशस्वी जैस्वाल 13 धावा करत माघारी परतला. त्यानंतर करूण नायर आणि केएल राहुल यांनी मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. मात्र, करूण नायर 40 धावा करत माघारी परतला. कर्णधार शुभमन गिल 16 धावांवर माघारी परतला. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने 3 गडी बाद 145 धावा केल्या. याच धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशी राहुल आणि पंतने पुढे खेळायला सुरुवात केली.

 

राहुलचे शतक अन् पंतची फटकेबाजी

केएल आणि पंतने संयमी खेळी साकारताना चौथ्या विकेटसाठी 141 धावांची भागीदारी साकारली. एकेरी-दुहेरी धावांवर भर देत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. यादरम्यान, पंतने शानदार खेळी साकारताना 112 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारासह 74 धावा फटकावल्या. पहिल्या दिवशी झालेल्या दुखापतीमुळे ऋषभ मैदानात उतरेल की नाही, यात शंका होती. पण, पंत मैदानात उतरला आणि इंग्लंडविरुद्ध धमाकेदार खेळी साकारताना अर्धशतक झळकावले. यादरम्यान, लंचपूर्वी डावातील 66 व्या षटकात पंत चुकीच्या पद्धतीने धावबाद झाला. 74 धावांवर स्टोक्सच्या थेट थ्रोवर तो माघारी परतला. लंचनंतर केएल राहुलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दहावे शतक पूर्ण केले. त्याने 177 चेंडूचा सामना करताना 13 चौकारासह 100 धावा केल्या. शतकानंतर मात्र तो शोएब बशीरच्या गोलंदजीवर झेलबाद झाला. या मालिकेतील केएलचे दुसरे शतक ठरले.

जडेजाचे शानदार अर्धशतक

पंत आणि केएल लागोपाठ बाद झाल्यानंतर अनुभवी रविंद्र जडेजा आणि नितीश कुमार रे•ाrने संघाचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला त्रिशतकी मजल मारुन दिली. चहापानानंतर रे•ाrला स्टोक्सने बाद करत भारताला सहावा धक्का दिला. रे•ाrने 4 चौकारासह 30 धावांचे योगदान दिले. यानंतर जडेजाने मात्र अर्धशतकी खेळी साकारताना 131 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 72 धावांचे योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदरने 23 धावा केल्या. जडेजा बाद झाल्यानंतर मात्र अवघ्या 11 धावांत 4 विकेट्स गमावल्या अन् भारतीय संघ 119.2 षटकांत 387 धावांत ऑलआऊट झाला. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने 3, तर जोफ्रा आर्चर व बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. भारतीय संघाने कसोटीत तिसऱ्यांदा अशी बरोबरी मिळवली आहे. यापूर्वी 1958 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कानपूर कसोटीत 222 धावा आणि 1986 मध्ये बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध 390 धावांची बरोबरी साधली होती. दरम्यान, भारतीय संघ 387 धावांत ऑलआऊट झाल्यानंतर तिसऱ्या दिवसअखेरीस बिनबाद 2 धावा केल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड पहिला डाव 387

भारत पहिला डाव 119.2 षटकांत सर्वबाद 387 (यशस्वी जैस्वाल 13, केएल राहुल 177 चेंडूत 13 चौकारासह 100, करुण नायर 40, शुभमन गिल 16, ऋषभ पंत 74, जडेजा 72, नितीश कुमार रे•ाr 30, वॉशिंग्टन सुंदर 23, आकाशदीप 7, ख्रिस वोक्स 3 बळी, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स प्रत्येकी दोन बळी).

विक्रमवीर राहुल

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केएल राहुलने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी इतिहास घडवला आहे. केएलने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये झुंजार शतक ठोकले आहे. या शतकी खेळीसह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

  1. राहुलचे लॉर्ड्सवरील एकूण आणि सलग दुसरे शतक ठरले. केएल कसोटीत लॉर्ड्समध्ये 1 पेक्षा अधिक शतक करणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. लॉर्ड्समध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक 3 शतके करण्याचा विक्रम हा माजी फलंदाज दिलीप वेंगसरकर यांच्या नावे आहे. या दोघाशिवाय, रवि शास्त्री, गुंडाप्पा विश्वनाथ, विनू मंकड, मोहम्मद अझरुद्दिन, सौरव गांगुली, अजित आगरकर, राहुल द्रविड आणि अजिंक्य रहाणे या 8 फलंदाजांनी लॉर्ड्सवर प्रत्येकी 1-1 वेळा शतक झळकावले आहे.
  2. केएलचे कसोटी कारकीर्दीतील हे एकूण 10 वे, विदेशातील 9 वे आणि इंग्लंडविरुद्ध चौथे शतक ठरले. तसेच या मालिकेतील ओपनर म्हणून दुसरे शतक ठरले आहे. केएलने पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात 137 धावांची खेळी केली होती. विशेष म्हणजे, जवळपास 4 वर्षानंतर त्याने लॉर्ड्समध्ये सलग दुसरे शतक झळकावले आहे. केएलने याआधी 12 ऑगस्ट 2021 रोजी इंग्लंड विरूद्ध दुस्रया कसोटीतील पहिल्या दिवशी शतक केले होते.
  3. राहुल लॉर्ड्सवर 2 शतके करणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला. त्याच्याशिवाय, परदेशी सलामीवीर बिल ब्राउन, गॉर्डन ग्रीनिज आणि ग्रॅमी स्मिथ यांनीही प्रत्येकी 2 कसोटी शतके झळकावली आहेत. इंग्लंडमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके करणारा तो भारतीय आहे.

 लॉर्ड्सवर शेवटच्या षटकांत राडा

सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जे घडलं, ते सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अखेरच्या सत्रात इंग्लंडच्या फलंदाजांनी वेळ वाया घालवायचा होता. त्यामुळे ते वारंवार क्रीज सोडून बाहेर जात होते, ज्यामुळे खेळाचा वेग मंदावला. भारतीय खेळाडूंनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. क्रॉलीचा टाइमपास पाहून शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज दोघेही चांगलेच चिडले. त्यांनी मैदानातच क्रॉलीशी शाब्दिक वाद घातला. सामना संपल्यानंतरही तणाव कायम राहिला आणि तिघांमध्ये उघडपणे खडाजंगी झाली. या सगळ्या घडामोडींमुळे चौथा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official
Next Article