कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केएल-पंतने टीम इंडियाला सावरले

06:58 AM Jul 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुसऱ्या दिवशी भारताच्या 3 बाद 145 धावा : बुमराहचा पंच, इंग्लंड ऑलआऊट 387

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने 3 गडी गमावत 145 धावा केल्या आहेत. टीम इंडिया अद्याप 242 धावांनी पिछाडीवर असून दिवसअखेरी केएल राहुल 53 तर ऋषभ पंत 49 धावांवर खेळत होते. तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव 387 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जो रुटचे शानदार शतक आणि जेमी स्मिथ, ब्रायडन कार्से यांनी पहिल्या डावात तुफानी फलंदाजी केल्यामुळे इंग्लंडला चारशे धावांच्या जवळपास पोहोचता आले. विशेष म्हणजे, जसप्रीत बुमराहने भेदक माऱ्यासह इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत धाडला.

प्रारंभी, या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने गोलंदाजीत चांगली सुरुवात केली, नितीश कुमार रे•ाr यांनी एकाच षटकात बेन डकेट आणि जॅक क्रॉलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवून 44 धावांवर इंग्लंडला दोन धक्के दिले. त्यानंतर जो रूट आणि ऑली पोप यांनी मिळून 109 धावा जोडल्या, ज्यामुळे इंग्लिश संघाने 150 धावांचा टप्पा ओलांडला. पोप 44 धावा काढून बाद झाला, त्यानंतर थोड्याच वेळात हॅरी ब्रूकही 11 धावांवर बाद झाला. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस जो रुटने 99 धावा केल्या होत्या, तर इंग्लंडने 4 गडी गमावून 251 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी इंग्लंड संघ फलंदाजीसाठी आला, तेव्हा जसप्रीत बुमराहने स्टोक्सला 44 धावांवर क्लीन बोल्ड केले. स्टोक्स बाद झाल्यानंतर काही वेळातच बुमराहने शतकवीर जो रुटलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

बुमराहचा पंच, इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांचा प्रतिकार

एकेकाळी इंग्लंडने 271 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या. त्यांना 300-320 च्या धावसंख्येपर्यंत पोहोचणेही कठीण वाटत होते. अशा परिस्थितीत जेमी स्मिथने 51 धावा आणि ब्रायडन कार्सने 56 धावा केल्या. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 84 धावांची खेळी केली. मोहम्मद सिराजने जेमी स्मिथच्या रुपात इंग्लंडला आठवा धक्का दिला. तो 51 धावांवर बाद झाला. बुमराहने जोफ्राच्या रुपात पाच विकट्सचा डाव साधल्यावर सिराजने कार्सेला 56 धावांवर बोल्ड करत इंग्लंडचा पहिला डाव 387 धावांवर आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेतल्या. याशिवाय, मोहम्मद सिराज आणि नितीश कुमार रे•ाr यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. जडेजाला एक विकेट मिळाली.

केएल राहुलचे नाबाद अर्धशतक

इंग्लंडचा पहिला डाव 387 धावांत आटोपल्यानंतर भारतीय संघाने सावध सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा भारताने 1 गडी गमावत 44 धावा केल्या होत्या. सलामीवीर यशस्वी जैस्वाल 13 धावा करुन बाद झाला. त्याला आर्चरने माघारी पाठवले. यानंतर करुण नायर आणि केएल राहुल यांनी चहापानापर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही. चहापानानंतर मात्र करुण नायरला स्टोक्सने बाद केले. नायरने 4 चौकारासह 40 धावांचे योगदान दिले. मालिकेत दमदार फॉर्ममध्ये असणारा कर्णधार गिल पहिल्या डावात अपयशी ठरला. त्याला 16 धावांवर वोक्सने तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर केएल राहुल आणि ऋषभ पंतने दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. राहुलने नाबाद अर्धशतकी खेळी साकारताना 5 चौकारासह 53 धावा केल्या. पंतने त्याला चांगली साथ देताना नाबाद 19 धावांचे योगदान दिले. यामुळे दुसऱ्या दिवसअखेरीस भारताने 3 गडी गमावत 145 धावापर्यंत मजल मारली होती.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड पहिला डाव 112.3 षटकांत सर्वबाद 387 (क्रॉली 18, बेन डकेट 23, ऑली पोप 44, जो रुट 104, बेन स्टोक्स 44, जेमी स्मिथ 51, कार्से 56, बुमराह 74 धावांत 5 बळी, मोहम्मद सिराज आणि नितीश कुमार रे•ाr प्रत्येकी दोन बळी)

भारत पहिला डाव 43 षटकांत 3 बाद 145 (यशस्वी जैस्वाल 13, केएल राहुल खेळत आहे 53, करुण नायर 40, शुभमन गिल 16, ऋषभ पंत खेळत आहे 19, जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स आणि कार्से प्रत्येकी 1 बळी).

बुमराहचे पाच बळी, अनेक विक्रमांना घातली गवसणी

जसप्रीत बुमराहने तिसऱ्या कसोटी सामन्यात पाच विकेट्स घेऊन इंग्लंड संघाचे कंबरडे मोडले. या कामगिरीसह बुमराहने लॉर्ड्स येथे पाच विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे. तो परदेशात एका डावात सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. बुमराहने भारताबाहेर 13 वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने कपिल देव यांना पिछाडीवर टाकून ही खास कामगिरी केली आहे. कपिल देव यांनी भारताबाहेर 12 वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्याची किमया साधली होती. याशिवाय, बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये जो रुटला (सर्वाधिक 11 वेळा) बाद केले आहे. हा विक्रमही त्याच्या नावे जमा झाला आहे. तसेच इंग्लंडमध्ये कसोटी खेळताना सवाधिक गडी बाद करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत बुमराहने दुसरे स्थान मिळवले आहे. त्याने आतापर्यंत 11 सामन्यामध्ये 46 गडी बाद केले आहेत. या यादीत इशांत शर्मा 51 बळीसह पहिल्या स्थानी आहे.

रुट एक्सप्रेस सुसाट!

भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुटने शतक झळकावले आहे. शतक पूर्ण करताच त्याने इतिहास रचला आहे. तो सध्याच्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज बनला आहे. या शतकासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आपले 37 वे शतक पूर्ण केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे. रूटने राहुल द्रविड आणि स्टीव्ह स्मिथ (प्रत्येकी 36 शतके) या दिग्गजांना देखील पिछाडीवर टाकले. यासह, रूट भारताविरुद्ध सर्वाधिक शतके करणारा खेळाडू देखील बनला आहे. त्याने भारताविरुद्ध 11 वे शतक झळकावून स्टीव्ह स्मिथची बरोबरी साधली आहे. तथापि, स्टीव्ह स्मिथने 24 सामन्यांमध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे. रूटने 33 सामन्यांमध्ये 11 शतके झळकावली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article