For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केकेआरसमोर आज राजस्थानला नमविण्याचे लक्ष्य

06:50 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
केकेआरसमोर आज राजस्थानला नमविण्याचे लक्ष्य
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

नव्या आत्मविश्वासाच्या भरवशावर गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स रविवारी कोलकाता येथे होणाऱ्या आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सविऊद्ध लढताना घरच्या मैदानावर विजय मिळविण्याचा आणि प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेल. चार लीग सामने शिल्लक असताना केकेआरसमोरील समीकरण सोपे आहे. चारही सामने जिंकून 17 गुण मिळवायचे आणि इतर निकालांवर अवलंबून न राहता आघाडीच्या चार संघांतील स्थान निश्चित करायचे. कागदावर हे आव्हान सोपे दिसल असले, तरी प्रत्यक्षात ते कठीण आहे.

त्यांच्या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात दोन घरच्या मैदानावर सामने होणार आहे. त्यापैकी एक आज रविवारी राजस्थान रॉयल्सविऊद्ध आणि बुधवारी चेन्नई सुपर किंग्सविऊद्ध होणार आहे. त्यानंतर 10 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविऊद्ध आणि 17 मे रोजी फॉर्ममध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविऊद्ध ते लढणार असून हे दोन दूरस्थ सामने आहेत. हैदराबादने हातपाय गाळलेले असले, तरी आरसीबी गुणतालिकेत बढती मिळवत आहे. यामुळे बेंगळूरमधील त्यांचा शेवटचा सामना हा एक महत्त्वाचा सामना ठरू शकतो.

Advertisement

राजस्थान रॉयल्स आणि सीएसके हे दोन्ही या हंगामातील सर्वांत सातत्यहीन संघांपैकी आहेत आणि बाहेर पडणारे ते पहिले संघ ठरलेले आहेत. असे असले, तरी गमावण्यासारखे काहीही नसल्यामुळे सीएसके आणि राजस्थान केकेआरचे इरादे बिघडवून टाकू शकतात. परंतु केकेआरची मोठी चिंता ही घरच्या मैदानावर त्यांच्या खराब कामगिरीची आहे. एकेकाळी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ईडन गार्डन्सवर या हंगामात पाच सामन्यांत फक्त एक विजय त्यांना मिळाला आहे. मागील पंजाब किंग्सविऊद्धचा त्यांचा सामना पावसात वाहून गेला.

त्यांच्या फिरकीपटूंना चेंडूवर पकड जमविण्याच्या बाबतीत आणि बदलत्या उसळीशी जुळवून घेण्यासंदर्भात संघर्ष करावा लागला आहे, याचा फायदा प्रतिस्पर्धी संघांनी अधिक प्रभावीपणे घेतला आहे. केकेआरची फलंदाजी देखील निराशाजनक राहिली आह. गेल्या हंगामात चर्चेत आलेला फिनिशर रिंकू सिंग आठ डावांमध्ये फक्त 169 धावा करू शकलेला आहे, तर फिल सॉल्टची अव्वल स्थानावरील उणीव भरून काढण्यासाठी आणलेल्या क्विंटन डी कॉकला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. परंतु सर्वांत मोठी प्रतिकूल बाब म्हणजे वेंकटेश अय्यर, ज्याला 23.75 कोटी ऊपयांना पुन्हा करारबद्ध करण्यात आले आहे आणि ज्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे, त्याला 10 सामन्यांतून फक्त 142 धावा करता आल्या आहेत.

या हंगामात केकेआरचा सर्वांत विश्वासार्ह फलंदाज राहिलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणेला क्षेत्ररक्षण करताना हाताला दुखापत झालेली आहे. असे असले, तरी केकेआरसाठी एक मोठी सकारात्मक बाब म्हणजे दिल्ली कॅपिटल्सवर त्यांनी 14 धावांनी मिळवलेला विजय. हा विजय त्यांचे मनोबल वाढवून गेलेला असेल. सुनील नारायण हा त्या विजयाचा शिल्पकार होता.

संघ-कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, अंगक्रिश रघुवंशी, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, लुवनिथ सिसोदिया, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, मोईन अली, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, एनरिक नॉर्टजे, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, सुनील नरेन, वऊण चक्रवर्ती आणि चेतन साकारिया.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, कुणाल सिंह राठोड, युधवीर सिंह चरक, नितीश राणा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, क्वेना मफाका, वानिंदू हसरंगा, महेश थीक्षाना, फजलहक फाऊकी, अशोक शर्मा आणि जोफ्रा आर्चर.

Advertisement
Tags :

.