‘केकेआर’चा सामना आज लखनौशी
वृत्तसंस्था/ कोलकाता
दोन वेळचा विजेता कोलकाता नाईट रायडर्स आज रविवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा सामना करणार असून यावेळी घरच्या मैदानावर खेळण्याच्या अनुकूलतेचा फायदा उठवून विजयी मार्गावर परतण्याचा ते प्रयत्न करतील. या दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन विजय मिळवले आहेत. केकेआर संघ सुनील नरेन व आंद्रे रसेल या कॅरेबियन जोडीवर खूप अवलंबून असल्याचे गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या त्यांच्या मागील सामन्यातून दिसून आले आहे. त्या सामन्यात सीएसकेने त्यांना सात गडी राखून पराभूत केले.
केकेआरच्या नितीश राणाला दुखापतीमुळे आजच्या सामन्यातही बाहेर बसावे लागणार असून कर्णधार श्रेयस अय्यर प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरला आहे, तर फलंदाज व्यंकटेश अय्यरची भूमिका स्पष्ट नाही असे दिसते. सनरायझर्स हैदराबादविऊद्ध प्रभावीरीत्या 35 धावा केल्यानंतर रमणदीप सिंगही चमकलेला नाही. दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध 54 धावा करून साऱ्यांना प्रभावित केलेला अंगक्रिश रघुवंशी पुन्हा चांगला डाव खेळू पाहील. गोलंदाजीत त्यांच्या मिचेल स्टार्कच्या खराब फॉर्मवर भरपूर चर्चा झाली आहे.
दुसरीकडे, लखनौला सलग दुसऱ्या सामन्यात त्यांचा सनसनाटी वेगवान गोलंदाज मयंक यादवची उणीव भासणार आहे. मयंकच्या जागी आलेला अर्शद खान प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरला आहे. मोहसिन खान हा चांगला पर्याय ठरू शकतो. परंतु तो दुखापतीतून पूर्णपणे ठीक झाला आहे की नाही हे पाहावे लागेल. लखनौचे क्विंटन डी कॉक आणि राहुल आज चांगल्यापैकी धावा जमा करू पाहतील. त्याशिवाय मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांचा समावेश असलेली त्यांची मधली फळीही भक्कम आहे.
संघ : कोलकाता नाईट रायडर्स-श्रेयस अय्यर (कर्णधार), के. एस. भरत, रेहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकूल रॉय, रमणदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, सुनील नरेन, वैभव अरोरा, चेतन साकारिया, हर्षित राणा, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन आणि मुजीब उर रेहमान.
लखनौ सुपर जायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, कृणाल पंड्या, युद्धवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शामर जोसेफ, मयंक यादव, मोहसिन खान, के. गौतम, अर्शिन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, अॅश्टन टर्नर, मॅट हेन्री आणि मोहम्मद अर्शद खान.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.