For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीएसकेविरुद्ध आज केकेआरला विजय अत्यावश्यक

06:17 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
सीएसकेविरुद्ध आज केकेआरला विजय अत्यावश्यक
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

आयपीएलमध्ये आज बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सची गाठ चेन्नई सुपर किंग्सशी पडणार असून यावेळी घरच्या प्रेक्षकांसमोर विजय मिळवणे केकेआरसाठी आवश्यक आहे. महेंद्रसिंग धोनीचा हा येथील शेवटचा सामना ठरण्याची शक्यता आहे. पाच वेळचा विजेता सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला असला, तरी धोनी अजूनही नेतृत्व करत आहे आणि त्याच्या उपस्थितीमुळे ईडन गार्डन्सवर सीएसकेलाही जोरदार पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे.

धोनीचे या शहराशी जवळचे वैयक्तिक संबंध राहिलेले आहेत. त्याचे सासरे येथे राहतात आणि तो त्याच्या कनिष्ठ क्रिकेटचा बराचसा भाग येथेच खेळलेला आहे. आजचा दिवस 43 वर्षीय धोनी आणि त्याच्या चाहत्यांस भावनिकदृष्ट्या भारावून टाकू शकतो. ईडन गार्डन्सने त्याच्या पहिल्या प्रथम श्रेणी शतकापासून ते त्याच्या सहा कसोटी शतकांपैकी दोन शतकांपर्यंत धोनीचे अनेक टप्पे पाहिले आहेत. आज 7 मे रोजी 7 क्रमांकाची जर्सी परिधान करून जेव्हा धोनी मैदानावर उतरेल तेव्हा अनेकांना या ऐतिहासिक ठिकाणी खेळण्याची धोनीची ही शेवटची वेळ आहे का, असा प्रश्न पडेल.

Advertisement

मागील सामन्यात आरसीबीविऊद्ध सीएसकेला दोन धावांनी स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारणारा धोनी आता पूर्वीसारखा प्रभावी राहिलेला नाही. 214 धावांचा पाठलाग करताना 2 बाद 172 अशा मजबूत स्थितीत असूनही सीएसके शेवटच्या षटकात कमी पडला. धोनीला शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर यश दयालने बाद केले आणि त्याला 8 चेंडूंत 12 धावा काढता आल्या. नंतर त्याने पराभवासाठी दोष आपल्यावर घेतला. पण चाहत्यांच्या मनात धोनीला अजूनही विशेष स्थान आहे. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी केकेआरसाठी हा ‘करा किंवा मरा’ पद्धतीचा सामना असला, तरी हा सामना निकालापेक्षा धोनीचा वारसा साजरा करण्याकडे अधिक झुकू शकतो.

केकेआरकडे सध्या 11 गुण आहेत आणि उर्वरित तीनही सामने जिंकल्यास त्यांचे गुण 17 होतील. तरीही प्लेऑफमधील प्रवेश नेट रन रेट आणि इतर निकालांवर अवलंबून राहू शकतो. केकेआरचे सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबी यांच्याविऊद्धचे उर्वरित सामने दूरस्थ आणि अवघड आहेत. राजस्थान रॉयल्सवर एका धावेने रोमांचक विजय मिळवल्यानंतर केकेआर त्या गतीवर भर देण्याचा प्रयत्न करेल. त्या सामन्यात आंद्रे रसेलचे पुन्हा फॉर्ममध्ये येणे महत्त्वाचे होते आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआरला वेंकटेश अय्यर देखील त्याची लय मिळवेल, अशी आशशा असेल. रसेल फिरकीपटूंचा सामना कसा करतो ते महत्त्वाचे ठरेल. कारण सीएसके या खेळपट्टीवर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांना वापरण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला, तरी धोनी अजूनही कर्णधार असल्याने आणि आयुष म्हात्रेसारखे तऊण खेळाडू छाप पाडण्यास उत्सुक असल्याने सीएसके निर्भयपणे खेळण्याचा प्रयत्न करेल. या हंगामात सीएसकेसाठी सर्वांत मोठी सकारात्मक गोष्ट 7 वर्षीय म्हात्रेचा उदय ही राहिली आहे. दुखापतग्रस्त कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या जागी त्याला करारबद्ध करण्यात आल्यानंतर म्हात्रेने आपली निवड सार्थ ठरविलेली आहे.

संघ-कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, अंगक्रिश रघुवंशी, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, लवनीथ सिसोदिया, वेंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, मोईन अली, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, एनरिक नॉर्टजे, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, सुनील नरेन, वऊण चक्रवर्ती आणि चेतन साकारिया.

चेन्नई सुपर किंग्स : एम. एस. धोनी (कर्णधार), शेख रशीद, आयुष म्हात्रे, दीपक हुडा, सॅम करन, रवींद्र जडेजा, देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथीराना, अंशुल कंबोज, आर. अश्विन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, राहुल त्रिपाठी, श्रेयस गोपाल, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, सी. आंद्रे सिद्धार्थ, वंश बेदी.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.