कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केकेआरचा दिल्लीवर 14 धावांनी विजय

06:58 AM Apr 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सामनावीर सुनील नरेनची अष्टपैलू खेळी :  विजयासह केकेआरच्या प्ले ऑफमधील आशा कायम

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात केकेआरने दिल्ली कॅपिटल्सवर 14 धावांनी विजय मिळवला. यामुळे दिल्लीला पुन्हा एकदा घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. याचवेळी, कोलकाता नाईट रायडर्सने या विजयासह प्लेऑफच्या शर्यतीत स्वत:ला जिवंत ठेवले आहे. या सामन्यात केकेआरच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो सुनील नरेन ठरला. फलंदाजी व गोलंदाजीत शानदार कामगिरी करत त्याने केकेआरच्या विजयात मोलाचे योगदान दिले. दुसरीकडे, सलग दोन पराभवामुळे दिल्लीच्या प्लेऑफच्या पोहोचण्याच्या वाटेत मात्र मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु केकेआरच्या फलंदाजांनी त्याला चुकीचे सिद्ध केले. केकेआरचे सलामीवीर रहमानउल्लाह गुरबाज आणि सुनील नारायण यांनी पहिल्या तीन षटकांत 48 धावा देऊन नाईट रायडर्सला जलद सुरुवात दिली. ही भागीदारी मिचेल स्टार्कने मोडली आणि त्याने गुरबाजला (12 चेंडू 26 धावा) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सुनीलने 16 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 27 धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने सलामीवीरांनी दिलेल्या जलद सुरुवातीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण तो मोठी खेळी खेळू शकला नाही. रहाणेने 14 चेंडूत 26 धावा केल्या. वेंकटेश अय्यर फक्त 7 धावा करून बाद झाला. अंगकृष रघुवंशी हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता आणि त्याने 32 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले. रिंकू सिंगनेही काही चांगले फटके खेळले पण नंतर तोही 36 धावा करून तंबुत परतला. यानंतर तळाचे फलंदाज अपयशी ठरले. पण सुरुवातीच्या फलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे केकेआरने 20 षटकांत 9 गडी गमावत 204 धावा केल्या.

घरच्या मैदानावर दिल्लीचा दुसरा पराभव

205 धावांच्या पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खुपच खराब झाली. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अनुकुल रॉयने अभिषेक पोरेलला (4) आऊट केले. यानंतर, पाचव्या षटकात करुण नायरनेही आपली विकेट गमावली. करुणच्या बॅटमधून 15 धावा आल्या. यानंतर केएल राहुलकडून मोठी खेळी अपेक्षित होती. पण केएल राहुल सातव्या षटकात धावबाद झाला. राहुलच्या बॅटमधून फक्त 7 धावा आल्या. पण, यानंतर कर्णधार अक्षर पटेल आणि फाफ डु प्लेसिसमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. डु प्लेसिसने 45 चेंडूत 62 धावांचे योगदान दिले तर अक्षर पटेलने 43 धावा केल्या. याशिवाय, विपराज निगमने 38 धावांची खेळी साकारली. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केल्यामुळे दिल्लीला 9 गडी गमावत 190 धावापर्यंत मजल मारता आली. हा सामना त्यांना 14 धावांनी गमवावा लागला.

संक्षिप्त धावफलक

केकेआर 20 षटकांत 9 बाद 204 (गुरबाज 26, सुनील नरेन 27, रघुवंशी 44, रिंकू सिंग 36, मिचेल स्टार्क 3 बळी, विपराज निगम व अक्षर पटेल प्रत्येकी दोन बळी)

दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 9 बाद 190 (डु प्लेसिस 62, अक्षर पटेल 43, विपराज निगम 38, करुण नायर 15, सुनील नरेन 3 बळी, वरुण चक्रवर्ती 2 बळी, वैभव अरोरा, आंद्रे रसेल प्रत्येकी एक बळी).

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article