महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘मुर्शिद’मध्ये केके मेनन

07:00 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अंडरवर्ल्डच्या जगतावर आधारित सीरिज

Advertisement

दीर्घकाळापासून प्रतीक्षा होत असलेली वेबसीरिज मुर्शिदचा अधिकृत ट्रेलर सादर करण्यात आला आहे. श्रवण तिवारीकडून दिग्दर्शित ही गँगस्टर थ्रिलर एक रोमांचक कहाणी प्रेक्षकांना दाखविणार आहे. केके मेननचा अभिनय आणि कहाणीत अंडरवर्ल्ड ज्याप्रकारे दर्शविण्यात आले आहे ते पाहता प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. केके मेननने यात मुर्शिद पठान ही मुख्य भूमिका साकारली आहे. मुर्शिद पठाणने मुंबईच्या गुन्हेगारी जगतावर 20 वर्षांपर्यंत राज्य केले होते.

Advertisement

या सीरिजमध्ये पोलीस निरीक्षक कुमार प्रताप ही भूमिका तनुज विरवानीने साकारली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री रति अग्निहोत्रीचा पुत्र असलेला तनुजने या भूमिकेसाठी मेहनत घेतली आहे. मी एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. केके मेनन यांच्यासारख्या अविश्वसनीय अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला सुदैवी मानत आहे. दिग्दर्शक श्रवण तिवारीसोबत काम करण्याचा अनुभव स्मरणीय राहिला असे तनुजने म्हटले आहे.

ही सीरिज प्रेक्षकांना 80 आणि 90 च्या दशकातील मुंबईतील अंडरवर्ल्डचे जग दाखविणार आहे. केके मेनन, तनुज विरवानी यांच्यासोबत या सीरिजमध्ये जाकिर हुसैन, राजेश श्रृंगारपुरे आणि अनंग देसाई हे कलाकार यात दिसून येतील. या सीरिजसाठी कहाणी देखील श्रवण तिवारीनेच लिहिली आहे. तर संगीत कुणाल करणने दिले आहे. ही सीरिज 30 ऑगस्ट रोजी झी5 वर प्रसारित होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article