कित्तूर - बेळगाव शहर अंतिम फेरीत
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित बेळगांव जिल्हास्तरीय माध्यमिक मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत बेळगांव शहर व कित्तूर यांनी प्रतिस्पर्ध्याचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. कॅम्पमधील मराठी विद्यानिकेतन शाळेच्या मैदानावर सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे केपीएल महिला क्रिकेट खेळाडू झोया काजी, श्रेया पोटे, बेळगांव शहराच्या पीईओ जहिदा पटेल, बेळगाव ग्रामीणच्या पीईओ साधना बद्री ,मराठी विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक बी जी पाटील, भरत बळ्ळारी, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव प्रवीण पाटील, बापू देसाई, नागराज भगवंतण्णावर, सी. आर. पाटील, देवेंद्र कुडची, सुनील देसाई, महेश हगीदळी, दत्ता पाटील या मान्यवरांच्या हस्ते यष्टीपूजन व खेळाडूंची ओळख करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कर्नाटक महिला प्रीमियर लीग स्पर्धेत प्रथमच खेळलेल्या झोया काजी व श्रेया पोटे या दोन महिला क्रिकेटपटूंचा शिक्षण खात्याच्या वतीने व भीमसेना राज्याध्यक्ष भरत बळ्ळारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या, प्रसंगी चंद्रकांत गोमाण्णाचे हर्ष रेडेकर, मिताली अर्कशालीसह विविध तालुक्मयाचे शिक्षक उपस्थित होते.