महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सहाव्या राष्ट्रभक्ती संमेलनाच्या अध्यक्षपदी किरण ठाकुर

10:31 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुणे : कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने येत्या 7 जानेवारी 2024 रोजी पुण्यात होणाऱ्या सहाव्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा तरुण भारतचे समूह प्रमुख, सल्लागार संपादक किरण ठाकुर यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त चंद्रकांत शहासने आणि अॅड. नंदिनी शहासने यांनी बुधवारी येथे दिली. ‘ओळख देशभक्तांची, शाळा तिथे क्रांतिमंदिर’ या संकल्पनेवर आधारित हे संमेलन होणार आहे. संस्थेने दोन हजार क्रांतिकारकांची चित्रे आणि दहा हजार क्रांतिकारकांची माहिती असणारे प्रदर्शन गावोगावी शाळांमध्ये प्रदर्शित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम 26 जानेवारी 2024 पर्यंत राहणार आहे. यंदाचे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनही याच संकल्पनेवर आधारित आहे. या पूर्वी राष्ट्रभक्ती, पर्यावरण, साक्षरता आणि आरोग्य अशा विविध संकल्पनांवर आधरित साहित्य संमेलने घेण्यात आली होती.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article