कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

किरण, दीपक अंतिम फेरीत

06:45 AM May 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/बँकॉक

Advertisement

चौथ्या थायलंड ओपन इंटरनॅशनल मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे मुष्टीयोद्धा किरण आणि दीपक यांनी उपांत्य फेरीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. महिलांच्या 75 किलो वजन गटात किरणने युक्रेनच्या पोलिना चेमेनला 5-0 असे एकतर्फी पराभूत केले. पुरुषांच्या 75 किलो वजन गटात दीपकने थायलंडच्या पीरापत यीसूला 5-0 असे एकतर्फी हरवून विजयी घोडदौड कायम ठेवली. स्थानिकांचा पाठिंबा असलेल्या यीसूविरुद्ध दीपकने डावपेचात्मक शिस्त राखली आणि गुण मिळविण्याचा संधींचा पुरेपूर लाभ घेत विजय साकारला.

Advertisement

विश्व बॉक्सिंगच्या पाठिंब्याने आशियाई बॉक्सिंगने आयोजित केलेल्या या स्पर्धेत पॉवरहाऊस असलेल्या चीन, उझ्बेकिस्तान, दक्षिण कोरिया, यजमान थायलंड येथील बॉक्सर्सनी भाग घेतला आहे.  महिलांच्या उपांत्य फेरीत 57 किलो गटात प्रिया आणि 70 किलो गटात सनेहा यांनी संघर्षमय लढा दिला. पण त्यांना कांस्यपदकावर समाधान मानवे लागले

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article